Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पांडवलेणी येथे स्टोव्हच्या भडक्यात विवाहिता ठार

Share
पांडवलेणी येथे स्टोव्हच्या भडक्यात विवाहिता ठार Latest News Nashik Woman Killed in Stove Fire at Pandavleni

नाशिक । स्टोव्हच्या भडक्यात गंभीररित्या भाजल्याने विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता.27) सायंकाळी पांडवलेणीच्या पायथ्यालगत घडली होती.

राधा जयसिंग राठोड( 22) असे विवाहितेचे नाव आहे. राधा ही सोमवारी सायंकाळी साडेचार पाच वाजेच्या सुमारास राहत्या घरात स्टोव्ह पेटवित होती. त्यावेळी स्टोव्हचा अचानक भडका झाला आणि यात तिचा चेहरा गंभीररित्या भाजला गेला.

पती जयसिंग राठोड यांनी तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!