Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिकरोड : बसच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू

Share
नाशिकरोड : बसच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू latest-news-nashik-woman-dies-in-bus-crash-at-nashikroad

नाशिकरोड : भरघाव येणाऱ्या एसटी बसने रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला जोरदार धडक दिल्याने या अपघातात महिलेचा मृत्यू झाला असून याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक मुक्ता टेलोरे (३८ रा,पळसे गाव) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की (दि. ३१) जानेवारी रोजी रात्री आठ वाजेच्या दरम्यान नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या किरण हॉटेल जवळ त्यांची पत्नी सुमन अशोक तेलोर (३५)घरगुती साहित्य आणण्यासाठी गेल्या होत्या. साहित्य घेऊन परत येत असतांना पुणे मार्गे नाशिककडे येणारी एसटी महामंडळाच्या बस क्र. एम. एच. ११ बी,एल. ९४६८ हिने जोरदार धडक दिल्याने या अपघातात गंभीर जखमी झाल्या. यावेळी त्यांना तात्काळ उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी पोलिसांनी बस चालक लक्ष्मण जनपा काळे (३५) दहिवड (सातारा डेपो) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस करीत आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!