Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर येथे जेवणाचे ताट न धुतल्याने महिलेला मारहाण

Share

सिन्नर : पुतण्याचे जेवणाचे खरकटे ताट घुतले नाही म्हणून पती व सासूने महिलेला मारहाण केल्याची घटना तालुक्यातील पालवेवाडी (दापूर) येथे घडली.

संगिता ज्ञानेश्वर पालवे (२९) असे मारहाण करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

बुधवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास पती ज्ञानेश्वर व सासू भीमाबाई पुंडलिक पालवे यांनी पुतण्याचे जेवणाचे ताट धुतले नाही म्हनून शिवीगाळ करून संगिताला फावड्याचा दांड्याने मारहाण केली. या मारहाणीत संगिता यांना हाताला व पाठीला दुखापत झाली.

याप्रकरणी सदर महिलेच्या फिर्यादीवरून वावी पोलीस ठाण्यात पती व सासू विरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!