वाईन उद्योजकांना अडचणीतून मुक्त करणार : शरद पवार

वाईन उद्योजकांना अडचणीतून मुक्त करणार : शरद पवार

नाशिक : वाईन उद्योगाला काही दिवसापासुन हलाकीचे दिवस आले आहे. मात्र वाईन उद्योगासाठी आणि द्राक्ष उत्पादकांच्या हितासाठी लवकरच वाईन उद्योजकांना अडचणीतून मुक्त करण्यासाठी उपमुख्य मंत्री अजीत पवार, दिलीप वळसे पाटील आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह वाईन उद्योजकांची बैठक घेण्यात येईल असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केले.

विंचुर येथील वाईन पार्क मध्ये शुक्रवारी (ता.१७) शरद पवार, छगन भुजबळ यांच्या हस्ते वाईन ग्रेप्सच्या क्रशिंगचा शुभांरभ फ्लेमिंगो वाईनरी येथे करण्यात आला. यावेळी शरद पवार म्हणाले की, देशामध्ये सर्वात प्रथम मी वाईनरी सुरु केली. मात्र नागरिकांची मानसिकता वेगळी असल्याने व्यवसायात जम बसला नाही. वाईन उद्योगासाठी आणि द्राक्ष उत्पादकांच्या विकासासाठी, मार्केटिंगसाठी प्रयत्न केले जातील वाईन ग्रेप्सपासुन विठ्ठल मल्ल्या यांनी ब्रँन्डी तयार करण्यास सुरु केली.

वाईनसाठी देखील परदेशी वाण असल्यास शेतकऱ्यांचा विकास होईल. यासाठी नवीन वाण आयात करण्याचा प्रयत्न आणि प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे वाईन व्हरायटी विकसीत होऊन शेतकऱ्यांच्या द्राक्षांना मागणी वाढेल. ज्या वाणाच्या वाईनला मागणी आहे तेच वाणांची लागवड करण्यासाठी शेतकरी पंसती देईल. तसेच वाईन उद्योगातील प्रतिनिधींनीही पुढाकार घेवुन त्यांच्या समस्या सोडवुन घ्याव्यात असे पवार यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com