Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

भारतावरही कोरोना व्हायरसचे सावट; ‘ही’ आहेत लक्षणे? अशी घ्या काळजी

Share
भारतावरही कोरोना व्हायरसचे सावट; 'ही' आहेत लक्षणे? अशी घ्या काळजी Latest News Nashik What Is The Coronavirus Symptoms Treatments and Variants

नाशिक : सध्या चीनमध्ये काही प्रांतात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना व्हायरसने आतापर्यंत चीनमध्ये १०० हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. दरम्यान हा व्हायरस वेगाने जगभर पसरत असल्याचे दिसत आहे. विशेषकरुन चीनच्या दक्षिण आणि पूर्वेतील देशांमध्ये कोरोना व्हायरस वेगाने पसरत आहे. यामध्ये थायलंड, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलियासारख्या देशांचा समावेश आहे. कोरोना विषाणू काय आहे, त्याची लक्षणे, विषाणूचा उत्पत्ती, कारणे, उपाययोजना आदी माहिती घेऊयात.

कोरोना विषाणू आहे काय?

रुग्णांमधून घेतलेल्या या विषाणूच्या सॅम्पलची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. त्यानंतर चीनचे अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटनेने हा कोरोना वायरस असल्याचं सांगितलं. कोरोना विषाणूचे अनेक प्रकार आहेत. मात्र, यापैकी केवळ सहा प्रकारच्या विषाणूंची माणसाला बाधा होऊ शकते. मात्र, नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर संक्रमित होणाऱ्या कोरोना विषाणूंची संख्या आता सात झाली आहे.

या नव्या कोरोना विषाणूच्या जेनेटिक कोडचं विश्लेषण करण्यात आलं. कोरोना विषाणूचा एक प्रकार म्हणजे सार्स. हा नवा विषाणू सार्सच्या जवळचा असल्याचं संशोधकांनी केलेल्या विश्लेषणात आढळलं आहे. सार्स प्रकारातला कोरोना विषाणू अत्यंत घातक मानला जातो. २००२  साली चीनमध्ये ८०९८ लोकांना सार्स विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यापैकी ७७४ लोकांचा मृत्यू झाला होता.

कोरोनाची लक्षणे

डोकेदुखी, नाक गळणे, खोकला, घसा खवखवणे, ताप, अस्वस्थ वाटणे, शिंका येणे, धाप लागणे, थकवा जाणवणे, निमोनिया, फुफ्फुसात सूज

कोरोना विषाणू किती गंभीर आहे?
कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये साधारणपणे सर्दी-खोकला अशी लक्षणं दिसतात. मात्र, लागण गंभीर असेल तर मृत्यूही ओढावू शकतो.

कोरोना विषाणू आला कुठून?
हा विषाणुचा नवीन प्रकार आहे. हे प्राण्यांच्या एका प्रजातीतून दुसऱ्या प्रजातीत संक्रमित होतात आणि त्यानंतर मानवालाही संसर्ग होतो. या संक्रमणावस्थेच्या काळात त्याचा शोध लागत नाही. नॉटिंगम युनिवर्सिटीत वायरोलॉजीचे प्राध्यापक असलेले जोनाथ बॉल यांच्या मते, “हा अगदी नवीन प्रकारचा कोरोना विषाणू आहे. या विषाणूची लागण प्राण्यांमधूनच माणसाला झाली असावी, अशी दाट शक्यता आहे.” सार्स हा विषाणू मांजरातून माणसांत आला होता. मात्र, या विषाणूचा मूळ स्रोत कोणता आहे, याची अधिकृत माहिती मिळालेली नाही.

चीनच का?
चीनची लोकसंख्प्राया अधिक असल्याने येथील लोकांचा संपर्क अधिक झाल्याने विषाणू पसरत आहे. एका प्राध्यापकाच्या मते लोकसंख्येचं प्रमाण आणि त्याची घनता यामुळे चीनमधले लोकांचे प्राणी वेड अधिक आहे. यातूनच या विषाणूची लागण झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

कोरोना विषाणूचा फैलाव सहज होतो का?
या विषाणुची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला झाल्याची अनेक उदाहरणं समोर आल्याचं चीनच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. कोरोना विषाणुग्रस्त रुग्णांची देखभाल करणाऱ्या अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येही या विषाणुची लक्षणं दिसली आहेत, असंही त्यांनी सांगितलं. या विषाणुविषयी चिंता वाटण्याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे या विषाणुमुळे सर्वांत आधी फुफ्फुसांवर परिणाम होतो. या विषाणुची लागण होताच व्यक्तीला खोकला सुरू होतो.

विषाणूचा फैलाव वेगाने होत आहे का?
या विषाणूचा परिणाम मर्यादित असेल, असं सुरुवातीला वाटलं होतं. मात्र, डिसेंबर नंतर अनेक प्रकरणं पुढे आली. या संसर्गाची सुरुवात चीनमधल्या वुहान शहरातून झाली. मात्र, आता या विषाणुचा फैलाव चीनमध्यल्या इतर शहरात आणि चीनबाहेरही झालेला आहे. थायलंड, जपान, अमेरिका आणि दक्षिण कोरियातही कोरोनाची लागण झाल्याची काही प्रकरणं समोर आली आहेत. वुहान शहरातून आलेले लोक कोरोनाग्रस्त असण्याची शक्यता जास्त आहे. नवीन वर्षांत चीन फिरायला गेलेल्या अनेक पर्यटकांच्या माध्यमातून या विषाणूचा फैलाव चीनबाहेरील अनेक देशांमधल्या लाखो लोकांमध्ये झाला असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

उपाययोजना

कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांवर स्वतंत्र खोलीत उपचार सुरू आहेत, जेणेकरून इतरांना याचा संसर्ग होऊ नये. प्रवाशांना ताप आहे का, हे तपासण्यासाठी प्रवासी ये-जा करतात अशा सर्व ठिकाणी थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय स्वच्छता राखता यावी आणि संसर्ग टाळवा, यासाठी सी-फूड मार्केट काही काळ बंद करण्यात आले आहेत. या सर्व उपाययोजना केवळ चीनमध्ये करण्यात आल्या आहेत. चीनव्यतिरिक्त आशियातील इतर अनेक देश आणि अमेरिकेतही असेच खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!