लॉक डाऊन म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या सविस्तर

लॉक डाऊन म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या सविस्तर

मुंबई : जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा शिरकाव आता महाराष्ट्रात झालेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लॉक डाऊनची घोषणा केली. सगळीकडे लॉक डाऊन म्हणजे नेमके काय? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. आणीबाणी काळात लॉक डाऊनची घोषणा केली जाते. यामध्ये साथीचे रोग आले तरीदेखील ते वाढू नयेत म्हणून लॉक डाऊनची घोषणा सरकार करू शकते.

लॉक डाऊनच्या काळात अत्यावश्यक, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व सेवा बंद ठेवल्या जातात. जमावबंदी केली जाते. आजार पसरू नयेत म्हणून दक्षता याकाळात घेतली जाते.

यापूर्वीच कोरोनाच्या भीतीने राज्यातील सरकारी, खासगी शाळांनी सुट्टी देण्यात आली आहे. राज्य सरकारने कोरोना व्हायरसबाबत खबरदारी घेण्यास सांगितले होते. सार्वजनिक ठिकाणचे मॉल, सिनेमागृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, आणि इतर महत्वाचे ठिकाण बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहे. कोरोनाची राज्यात झपाट्याने वाढ होऊ नये म्हणून राज्य सरकारने आरोग्य प्रशासनाला खबरदारी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत.

दरम्यान, आज पुकारलेल्या जनता कर्फ्यूमध्येही रुग्णसंख्या वाढली आहे. दुसरीकडे मुंबईतील एका व्यक्तीचे कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. यामुळे आज दुपारी रेल्वे प्रशासनाने रेल्वेसेवा ३१ मार्चपर्यत किंवा पुढील आदेश येईपर्यंत बंद केली आहे.

लॉक डाऊन हा शब्द सर्वांसाठीच नवीन आहे. नागरिकांच्या जीवाला जर परिसरात धोका निर्माण होत असेल तर राज्य सरकार त्या परिसरातील नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत करू शकतं. अन्यथा घराबाहेर न पडण्यास मज्जाव करू शकतं.
हा निर्णय किती कालावधी करता घेण्यात येतो? किती काळ लागू केल्या जाऊ शकतो? याचे अधिकार फक्त सरकारलाच असतात. किंबहूना हे त्या ठिकाणच्या परिस्थितीवर अवलंबून असतं.

राज्यात लॉक डाऊन झाल्यानंतर राज्यातील वाहतूक सेवा पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. व्यापार ठप्प होईल. नागरिकांना घराबाहेर पडण्यास परवानगी दिली जाणार नाही. मात्र असे असले तरी अत्यावश्यक सेवा जसे, रुग्णालये, औषधी दुकाने, अग्निशमक दल, रुग्णवाहिका या सेवा सुरूच राहतील असे सांगण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com