Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकसुरगाणा : ‘साहेब, लवकर पिण्यासाठी पाणी पाठवा हो’; महिलांची आर्त हाक

सुरगाणा : ‘साहेब, लवकर पिण्यासाठी पाणी पाठवा हो’; महिलांची आर्त हाक

हतगड : सुरगाणा तालुक्यातील भेनशेत गावातील महिलांची आर्त हाक सध्या संपूर्ण देशात व राज्यात करोना रोगाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असून घरी राहा, सुरक्षित राहा असा संदेश तालुका प्रशासना कडून दिला जात आहे.

परंतु सुरगाणा तालुक्यातील भेनशेत येथील महिलांना मात्र हंडाभर पाण्यासाठी आजही संकट काळात घराबाहेर पडल्या शिवाय पर्याय नसल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. गावास पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठल्याने पिण्यास पाणी कुठेच मिळत नसून ऐन करोना आपत्ती काळात पाणी टंचाई चे सावट गडद झाले आहे.

- Advertisement -

दरम्यान पाण्या अभावी नागरिकांसह जनावरांचे मोठे हाल होत असून महिलांना पाण्यासाठी तासंतास पायपीट करावी लागते. महिलांना या त्रासा पायी शारीरिक दुःखाना सामोरे जावे लागत आहे. हंडाभर पाण्या साठी ३ ते ४ किमी अंतरावर असलेल्या नदी नाल्यावरील डबक्यात साचलेल्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. या होणाऱ्या त्रासामुळे जेवढे लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर पाणी पाठवा हो’ अशी आर्त विनवणी महिला वर्गाकडून संबंधित प्रशासनास केली जात आहे.

हंडाभर पाण्यासाठी तासंतास संघर्ष करावा लागत आहे. घरात आजिबात पाणी नसल्याने नदी-नाल्या वरील गाळयुक्त पाणी न्यावे लागत आहे, आता ते ही पाणी संपण्याच्या मार्गावर आहे.
-सोमीबाई खुरकुटे, ग्रामस्थ

गेल्या महिन्या पासून विहिरी ने तळ गाठण्यास सुरवात केली आहे. आता पिण्याचा पाण्यासह जनावरांना देखील पाणी टंचाई च्या झळा बसत आहे, तालुका प्रशासनाने लवकर पाणी उपलब्ध करून महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवावी.
– मनोहर जाधव, सामाजिक कार्यकर्ता.

- Advertisment -

ताज्या बातम्या