Video | सुरगाणा : अनेक गावांत विहिरी आटल्या, झिऱ्यात उतरून महिलांचा पाण्यासाठी संघर्ष

jalgaon-digital
1 Min Read

सुरगाणा : तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणी टंचाई जाणवत असून यासाठी टँकर सुरू करावेत अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहेत.

दरम्यान तालुक्यातील म्हैसमाळ, देवळा, गळवड, शिरीषपाडा या ठिकाणी भीषण परिस्थिती निर्माण या झाली असून येथील महिलांना दीड- दोन किमी जाऊन झिऱ्यावरून पाणी आणावे लागत आहे. यासाठीचे निवेदन आधार फाऊंडेशनच्या सुरगाणा तहसीलदार यांना टँकर सुरू करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले आहेत.

गेल्या अनेक दशकांपासून दुर्लक्षित असलेल्या आणि भीषण या गावांना अद्यापही पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. आधार फाऊंडेशनने याबाबत या गावांना प्रत्यक्ष पाहणी केली. यातील मनोहर जाधव, हेमराज महाले आणि काही सामाजिक कार्यकर्ते यांनी तहसिलदार सुर्यवंशी, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांना निवेदन दिले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *