Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

विनायक मेटे यांचा शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

Share
विनायक मेटे यांचा शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा Latest News Nashik Vinayak Mete Resigns as Chairman of Shivasmarak Samiti

मुंबई : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अमंलबजावणी, देखरेख आणि समन्वय समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आपला राजीनामा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव येत्या काही दिवसांत होत आहे. दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी राज्यभरात शिवजन्मोत्सव जातो. परंतु दरवर्षी प्रमाणे यंदाही तारीख आणि तिथीचा वाद सुरु झाला आहे. या वादातून मेटे यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.

मेटे हे २०१५ पासून समितीच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत. विनायक मेटेंची नियुक्ती तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मेटे यांनी पत्रात म्हटले आहे कि, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडीचे सरकार सत्तेवर आले असल्यामुळे आपल्या विचारानुसार इतर विकासाची कामे होणे अपेक्षित आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम सुद्धा आपल्या विचाराने व्हावे’ म्हणून आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!