व्हिक्टोरिया पूल झाला १२५ वर्षाचा

नाशिक : नाशिक शहराची ऐतिहासिक ओळख म्हणून असलेला व्हिक्टोरिया पुलाला आज १२५ वर्ष पूर्ण झाली. शहरातील या मुख्य रस्त्यांना जोडणारा हा पूल ब्रिटिश काळात १८९५ साली बांधला गेला.

दरम्यान शहरातील महत्वाचा पूल म्हणून ओळख असलेला ‘व्हिक्टोरिया’ पूल होळकर पूल म्हणूनही ओळखला जातो. १४ जानेवारी १८९५ साली पुलाचे लोकार्पण मुंबईचे राज्यपाल लोर्ड हेरीस यांच्या हस्ते झाले होते. पुलाच्या बांधकामासाठी १० लाख रुपये खर्च झाल्याचे नोंदीवरून दिसून येते. आजमितीस या पुलास १२५ वर्ष पूण होत असून आजही हा पूल मोठ्या थाटात उभा आहे.

तब्बल १२५ वर्षांपासून ऐतिहासिक ‘व्हिक्टोरिया’ (होळकर पूल) पुलाने अनेक महापुरांचा सामना केला आहे. अजूनही निसर्गाचे अनेक प्रकोप झेलत या पुलासोबत नाशिकच्या अन् नाशिककरांच्या अनेक घटना किंबहुना अविस्मरणीय आठवणी जोडल्या आहेत.