Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसिन्नर : विंचूरदळवी येथे ग्रामस्थांना बचत गटाच्या महिला पुरवणार भाजीपाला

सिन्नर : विंचूरदळवी येथे ग्रामस्थांना बचत गटाच्या महिला पुरवणार भाजीपाला

विंचुरदळवी : गावात बाहेरून भाजीपाला विक्रीसाठी येऊ नये तसेच गावातील भाजीपाला बाहेर जाऊ नये यासाठी विंचूर दळवी ग्रामपंचायतीने सर्व ग्रामस्थांना बचत गटाच्या माध्यमातून भाजीपाला पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी गावातील बचत गटाला ग्रामपंचायतीच्या वतीने भांडवल उपलब्ध करून देण्यात आले आहे.

गावातील नागरिक भाजीपाला खरेदी करण्यासाठी जवळच असलेल्या भगूर किंवा पांढुर्लीला जातात. ते बंद करण्याच्या सूचना ग्रामपंचायत च्या वतीने देण्यात आल्या असून स्थानिक बचत गटातील महिलांच्या मार्फत भाजीपाला गावातच उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनांनुसार उपाययोजना करण्याकरिता गावात समिती गठीत करण्यात आली आहे.

या समितीचे सदस्य सकाळी गावात फिरुन जनजागृती करणार आहेत. विना मास्क कुणीही घराच्या बाहेर पडु नये, तसे आढळून आल्यास ५००/- रुपये दंड आकारण्यात येणार आहे. ही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येणार आहे असे ग्रामविकास अधिकारी संजय गिरी यांनी सूचित केले आहे. गावातच भाजीपाला उपलब्ध करून तो रास्त दरात विकण्यात येणार आहे. त्यासाठी श्री स्वामी समर्थ महिला बचत गटाला ग्रामनिधीतून १५ हजार रुपये खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यात आले आहे.

गावातील मेडीकल सोडून किराणा दुकाने बुधवार व शनिवार पुर्णपणे बंद राहतील, इतर दिवशी सकाळी ८ ते १२ आणि दुपारी ५ ते ६ या वेळेतच ही दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय ग्रामसमितीच्या बैठकीत घेण्यात आला.

बाहेरगावी भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वाहनधारकांनी आपल्या वाहनामधे प्रवासी वाहतूक होणार नाही याची काळजी घ्यावी. तसे आढळून आल्यास त्यांच्यावरदेखील आपत्ती व्यवस्थापन कायदा व कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करणेत येईल असा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या