स्पर्धा परिक्षार्थींवर बेरोजगारीचे ढग; परिक्षा स्थगित, नोकरभरती बंद

स्पर्धा परिक्षार्थींवर बेरोजगारीचे ढग; परिक्षा स्थगित, नोकरभरती बंद

नाशिक : करोनामुळे आर्थिक व्यवस्था डबघाईला आल्याचे कारण देत राज्य शासनाने सर्व प्रकारची शासकीय भरती रद्द केल्या आहेत. याच्या परिणामी गेली दहा दहा वर्षांपासून स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार असून आता स्थगित झालेल्या परिक्षातरी होणार किंवा नाही असा संभ्रम सर्वांमध्ये आहे.

लोकसेवा आयोग (युपीएससी)व राज्य सेवा आयोग (एमपीएससी)ने जानेवारीमध्येच पुर्व तसेच मुख्य परिक्षांचे वेळापत्रक जाहिर केले होते. ५ एप्रिल रोजी राज्यसेवा पुर्व परिक्षा होणार होती. तर ३ मे ला संयुक्त परिक्षा होणार होती. यासाठी राज्यातून लाखो विद्यार्थ्यांनी अर्ज तसेच फि भरलेली आहे. परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या.

अशातच दोन दिवसांपुर्वी राज्य शासनाने अर्थ व्यवस्थेचे कारण पुढे करत सर्व प्रकारच्या शासकीय भरती या वर्षात करणार नसल्याचे जाहिर केले आहे. यामुळे तसेच लॉक डॉन वाढताच या परिक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्या आहेत. यामुळे गेली आठ ते दहा वर्षांपासून अभ्यास करणार्‍या स्पर्धा परिक्षांच्या परिक्षार्थींवर बेरोजगारीचे ढग दाटले आहेत.

या वर्षाच्या कालावधीत अनेक विद्यार्थ्यांचे वय परिक्षा देण्यासाठी कालबाह्य ठरणार असल्याने त्यांचे प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्पप्न कायम अपुर्ण राहणार आहे. मुळातच राज्यात बेरोजगारांची संख्या मोठी आहे.

मंदिच्या परिणामी तसेच आता करोनामुळे आर्थिक फटका बसल्याने कंपन्यांनी कामगार कपात सुरू केली आहे. अशात शासनाकडून अपेक्षा असताना शासनानेही भरती प्रक्रिया न करण्याचा निर्णय न घेतल्याने राज्यातील बेरोजगांमध्ये मोठी वाढ होणार आहे.

राज्यासह नाशिकमध्ये परिक्षा देणार्‍यांचे प्रमाण मोठे आहे. शहरात २५ ते ३० अभ्यासिका आहेत. तर सुमारे १५ स्पर्धा परिक्षांचे क्लासेस आहेत. हजार पेक्षा अधिक विद्यार्थी शहरात स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करत आहेत. याहस पुणे हे स्पर्धा परिक्षा अभ्यासाचे केंद्र असल्याने पुण्यामध्ये अभ्यासासाठी गेलेले नशिकसह राज्यभरातील हजारो विद्यार्थी अडकून पडले आहेत. या सर्वांची सुटका करावी, युपीएससीच्या धरतीवर एमपीएससीने जाहिर केलेल्या परिक्षा घ्यावात अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

अनेक अधांतरी
करोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन सुरू होण्यापुर्वी झालेल्या राज्यसेवा मुख्य परिक्षेंच्या मुलाखतींचा निकाल लागलेला नाही. पीएसआय परिक्षांचा निकाल लागला आहे. परंतु त्यांच्या शारिरीक चाचण्या झालेल्या नाहीत. तर मंंत्रालयिन लिपिक पदाच्या भरतीत प्रतिक्षा यादिवर असलेले अनेकजण अडकले आहेत. अशा मध्यंतरीच लटकलेल्या भरती प्रक्रियेचे काय होणार याची मोठी चिंता काठावरील विद्यार्थ्यांना लागलेली आहे.

मुलांमध्ये संभ्रम
गेली अनेक वर्षापासून मुले स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करत आहेत. परिक्षा तोंडावर असतानाच करोनामुळे त्या स्थिगित करण्यात आल्या. त्या लॉकडॉन संपल्यावर होण्याची आशा होती. परंतु आता नोकरभरतीच होणार नसल्याने परिक्षाही होणार की नाही अशी सर्वांची संभ्रमावस्था आहे. युपीएसीच्या धर्तीवर एमपीएसी ने परिक्षा घ्याव्यात.
– ज्ञाानेश्वर जाधव, स्पर्धा परिक्षार्थी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com