Saturday, April 27, 2024
Homeनाशिकनेट परीक्षेत अवघे सहा टक्के विद्यार्थी पास; येथे पहा निकाल

नेट परीक्षेत अवघे सहा टक्के विद्यार्थी पास; येथे पहा निकाल

नाशिक : नेट परीक्षेचा निकाल सरत्या वर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच मंगळवारी दुपारच्या सुमारास लागला. या परीक्षेचा निकाल सहा टक्के लागला असून,यंदाही नाशिकचा निकाल कमी लागला आहे.

दरम्यान नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या दि.२ ते ६ डिसेंबर या कालावधीत हि परीक्षा ऑनलाइन पद्धतीने देशातील सातशे केंद्रांवर ही परीक्षा पार पडली होती. या परीक्षेसाठी १० लाख ३४ हजार ८७२ उमेदवारांनी नोंदणी केली होती तर त्यातील ७ लाख ९४ हजार उमेदवारांनी परीक्षा दिली होती. यामध्ये सहा टक्के विद्यार्थी पास झाले असून निकालाचा दर्जा घसरल्याचे निदर्शनास आले आहे.

- Advertisement -

यात देशभरातून सात हजार १४७ सहाय्यक प्राध्यापक आणि कनिष्ठ संशोधकपदासाठी परीक्षा देणारे पाच हजार ९२ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेसाठी नाशिकमधून सुमारे आठ हजारावर विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. येथील डब्लूएनएस परीक्षा केंद्रात या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

मागील वर्षांपेक्षा यंदा कमी कालावधीत हा निकाल जाहीर केला असून यामुळे पुढील काळात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे. हा निकाल ntanet.nic.in या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या