Thursday, April 25, 2024
Homeनाशिकइगतपुरी : रायांबे येथील दोन महिला करोना पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या पाचवर

इगतपुरी : रायांबे येथील दोन महिला करोना पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या पाचवर

घोटी : इगतपुरी तालुक्यात करोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढत होती तरी त्यांच्या संपर्कातील लोकांचे चाचणी अहवाल निगेटीव्ह येत गेल्याने दिलासा मिळत होता, मात्र रायांबे येथील प्रकरणाने याला छेद देण्यात आला असून दोन दिवसांपूर्वीच रायांबे येथील नोकरीनिमित्त मुंबई कनेक्शन असणाऱ्या युवकाला करोनाची बाधा झाली होती.

त्यामुळे त्याच्या कुटुंबातील व संपर्कातील हायरिस्क घटकातील १३ लोकांना आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले होते. मात्र आज यातील दोन महिलांना करोनाची लागण झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली. या दोन्ही महिला बाधित रुग्णाच्या कुटुंबातील सदस्य असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

- Advertisement -

घोटी – इगतपुरी येथील करोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील कुटुंब व अन्य नागरिकांचे टेस्ट रिपोर्ट निगेटीव्ह आले होते. त्यामुळे रायांबे येथील २९ वर्षीय युवकाच्या संपर्कातील कुटुंब सदस्य व लोकांचे रिपोर्ट काय येतात याकडे प्रशासन, आरोग्य विभाग व तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र आयसोलेशन करण्यात आलेल्या हायरिस्क सदस्यांतील पत्नी व भावजय यांचे टेस्ट रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची व ग्रामस्थाची चिंता वाढली.

यामुळे इगतपुरी तालुक्यात आता एकूण पाच करोना रुग्णसंख्या झाली असून त्यात ३ पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे.

प्रशासनाचे अधिकारी तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी एम बी देशमुख यांच्या पथकाने आज पुन्हा रायांबे येथे व्हिजिट देऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले तसेच ग्रामस्थानीं व परिसरातील नागरिकांनी शासनाच्या सूचनांचे पालन करावे, नागरिकांशी संपर्क टाळावा ,घराबाहेर पडताना तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधावा, सोशल डिस्टिंगशनचे पालन करावे, अशा सूचना देण्यात आल्या. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी मात्र जरूर घ्यावी असे आवाहनही करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या