Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकमनमाड शहरात दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ

मनमाड शहरात दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ

मनमाड : शहरात आज (दि.१०) दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. या दोघांमध्ये एक महिला आणि एका पोलिसाचा समावेश आहे.

दरम्यान गेल्या आठवड्यात एक रुग्ण आढळून आल्यानंतर शहरातील विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत असतांनाच आज पुन्हा दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याचे कळताच नागरिकांच्या चिंतेत भर पडली. तर प्रशासना वरील ताण देखील वाढला आहे. आता शहरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीन झाली आहे.

- Advertisement -

या बाबत अधिक माहिती अशी की शहरातील आययुडीपी भागातील वयोवृद्ध महिलेला सर्दी खोकल्याचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना खाजगी रुग्णलायत नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. येथे तपासणी करण्यात आली असता त्यांच्यात करोनाचे लक्षण दिसून आल्यामुळे त्यांचा स्वॅब पाठविण्यात आला होता.

आज त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर दुसरा रुग्ण हा पोलीस असून मालेगाव येथे कर्तव्य बजावत होता, त्याचा ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या तीन झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या