Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यात अफवेचा पहिला गुन्हा; दोघे ताब्यात

Share

येवला : व्हाट्सअप ग्रुपवर पाटोदा व ठाणगाव येथे कोरोनाचे रुग्ण आढळल्याची अफवा पसरविणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामुळे कोरोना संदर्भात अफवा पसरविणारा जिल्ह्यातील पहिला गुन्हा घडला आहे. ऋत्विक लक्ष्मण काळे, कलीम सलीम पठाण अशी अफवा पसरवणाऱ्या तरुणांची नवे आहेत.

दरम्यान राज्यात कोरोना व्हायरसचा फैलाव रोखावा यासाठी राज्यशासन सर्वोतपरी प्रयत्न करीत आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अफवा पसरू नये यासाठी काळजी घेतली जात असतांना येवला तालुक्यात हा गुन्हा घडलं आहे. तालुक्यातील नागडे व निमगाव मढ येथील तरुणांनी ठाणगाव येथे कोरोनाचा रुग्ण आढळल्याची अफवा व्हाट्सअँप ग्रुपवर पसरवली.

अफवा पसरविल्याने परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले. त्यानंतर परिसरात अनेकांनी याबाबत इतरही ठिकाणी अशी माहिती कळविल्याने स्थानिकांमध्ये घबराट पसरली. हि माहिती पोलिसांना कळताच या दोघांना ताब्यात घेतले.

सध्या कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातलेला असताना अशा अफवांचे पेव सोशल मीडियावर फुटले आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांना बळी न पडता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!