Friday, April 26, 2024
Homeनाशिकराज्यात करोनाचे एकूण २० हजार २२८ रुग्ण

राज्यात करोनाचे एकूण २० हजार २२८ रुग्ण

मुंबई : राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २० हजार २२८ झाली आहे. आज ११६५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ३३० करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३८०० रुग्ण बरे झाले आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख २७ हजार ८०४ नमुन्यांपैकी २ लाख ०६ हजार ४८१ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर २० हजार २२८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ४१ हजार २९० लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार ९७६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -

आज राज्यात ४८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ७७९ झाली आहे. मालेगाव शहरातील ८ मृत्यू हे २५ एप्रिल ते ८ मे २०२० या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २७, पुण्यातील ९, मालेगाव शहरात ८, पुणे जिल्ह्यात १, अकोला शहरात १, नांदेड शहरात १ तर अमरावती शहरात १ मृत्यू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या