सिंन्नर : सोमठाणेत आढळले तीन बछडे; आईची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरु

सिंन्नर : सोमठाणेत आढळले तीन बछडे; आईची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरु

सिन्नर : तालुक्यातील सोमठाणे येथील ऊसाच्या शेतात बिबट्याची तीन ते चार दिवसांचे तीन बछडे आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मादी बिबट्याने याचवेळी एका बछड्यास घेऊन गेली आहे. तर उर्वरित दोन बछडे अद्यापही उसाच्या शेतात आहे. त्यामुळे वनअधिकारी इतर दोन बछड्याची भेट घडवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

दरम्यान सोमठाणे-पंचाळे रस्त्यावरील वस्तीजवळ उत्तम पदाडे यांच्या उसाच्या शेतात कामगारांना हे चार बछडे आढळून आले. यावेळी बछड्यापाठोपाठ मादी बिबट्या आल्याने कामगारांची तारांबळ उडाली. यावेळी मादी बिबट्याने एका बछड्यास घेऊन गेली आहे.

या घटनेनंतर कामगारांनी थेट गावात धूम ठोकत सदर घटनेची माहिती स्थानिक शेतकऱ्यांना दिली. यावेळी वनखात्याचे अधिकारीही घटनास्थळी दाखल होत माहिती घेतली. मादी बिबट्या उर्वरित दोन बछड्याना घेऊन जाईल या अंदाजाने वनाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पिंजरा लावण्यास मनाई केली आहे.

परिसरात ऊसतोड थांबविण्यात आली असून परिसर निर्मनुष्य करण्यात आला आहे. सदर घटनास्थळावर 360 डीग्री कँमेरा ट्रँप लावला आहे. तसेच पिंजरा तयार असून वनकर्मचारी व ईको एकोचे स्वयंसेवक कँमेराद्वारे लक्ष ठेउन आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com