आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी शहरात तीन बसेस कार्यरत; जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी शहरात तीन बसेस कार्यरत; जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

नाशिक : शहरातील अनेक डॉक्टर, नर्सेस, परिचारिका, अधिकारी तसेच कर्मचारी यांना रुग्णालयात व कार्यालयात येण्याजाण्यासाठी तीन शहर बसेस सुरु करण्यात आल्या आहेत.

दरम्यान जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या संकल्पनेतून हा निर्णय घेण्यात आला आहे. (दि. २९) पासून ही सेवा सुरु करण्यात आली असून केवळ आराेग्य कर्मचाऱ्यांसाठी तीन शहर बसेस सुरू झाल्या आहेत.

सध्या लॉक डाउनच्या काळात शहरातीलवाहतूक सेवा बंद असून फक्त दूध, किराणा अन्नधान्य याबाबतची वाहने वाहतूक करताना दिसतात. अशावेळी शहरातील अनेक अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर, कर्मचारी यांना येण्याजाण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना लक्षात आले. त्यांनी तात्काळ शहर बससेवेतील तीन बसेस जिल्हा शल्य चिकित्सक यांना उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न सुटला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com