Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

लॉकडाऊन काळात राज्य उत्पादन शुल्क विभागात १२२१ गुन्ह्यांची नोंद; तुम्हीही करू शकता तक्रार?

Share

मुंबई : कोरोना वायरस रोखण्यासाठी असलेल्या लॉकडाऊन काळात राज्यातील मद्यविक्रीच्या अनुज्ञप्ती बंद आहेत. या कालावधीत अवैध मद्यविक्री व वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कार्यवाही केली आहे.

 

यात (दि. ३) एप्रिलपर्यंत राज्यात एकूण १२२१ गुन्ह्याची नोंद झाली असून एकूण २ कोटी ८२ लाख ३१ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच ३६ वाहने जप्त केली असून ४७२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

शेजारील राज्यांमधून महाराष्ट्रात होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी विभाग २४ तास कार्यरत आहे. त्यानुसार नाकाबंदी केली असून गोवा, दादरा- नगर हवेली, दीव- दमण, कर्नाटक व मध्यप्रदेश राज्यातून अवैध मद्य येणार नाही याकरिता १२ कायमस्वरूपी आंतरराज्य सीमा तपासणी नाक्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी-कर्मचारी तपासणी करीत आहेत. तसेच १८ तात्पुरते सीमा तपासणी नाके देखील उभारण्यात आले आहेत.

अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार करण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24×7 सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. त्यासाठी टोल फ्री क्रमांक 18008333333 व्हाट्सअँप क्रमांक 8422001133.

ई-मेल commstateexcise@gmail.com असा आहे. करिता सदर नमूद क्रमांकावर अवैध मध्ये विरुद्ध तक्रार नोंदविण्यात यावी असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत करण्यात येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!