Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

‘नीट’ अभ्यासक्रमात बदल नाही; अफवांवर विश्वास ठेवू नका

Share

नाशिक | प्रतिनिधी

एमबीबीएस व बीडीएस या वैद्यकीय शाखेच्या अभ्यासक्रमांसाठी देशस्तरावर घेण्यात येणाऱ्या ‘नीट’ परीक्षेच्या अभ्यासक्रमात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. विद्यार्थी व पालकांनी अफवांवर विश्वास ठेवून संभ्रमात पडू नये. तुमच्याकडे येणारी माहिती ही विश्वासार्ह सूत्रांकडूनच तपासून घ्यावी, असे आवाहन नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) वतीने करण्यात आले आहे.

सर्वत्र लॉकडाऊन असल्याने ‘नीट’ आणि ‘जेईई’सारख्या महत्त्वाच्या परीक्षाही लांबणीवर पडल्या आहेत. या कालावधीत काही नागरिकांकडून विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न झाला आहे.

‘नीट’चा अभ्यासक्रम बदलला असल्याचे खोटे सर्क्युलर सामाजिक माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये पसरविले गेले होते. त्यामुळे विद्यार्थी व पालक संभ्रमात पडले होते. याची दखल घेत खोट्या बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन एनटीएला करावे लागले. मुळात एनटीए या संस्थेद्वारे केवळ परीक्षेचे नियोजन केले जाते. ‘नीट’चा अभ्यासक्रम एनटीए ठरवित नसून, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने तो निश्चित केला जातो. विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम mciindia.org या वेबसाइटवरून मिळविता येणार आहे.

एनटीएच्या वतीने केवळ अभ्यासक्रमाची लिंक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येते व परीक्षेचे नियोजन केले जाते, असेही एनटीएने या पार्श्वभूमीवर स्पष्ट केले आहे. या परीक्षेशी संबंधित काही शंका असल्यास विद्यार्थ्यांनी ८२८७४७१८५२ , ८१७८३५९८४५, ९६५०१७३६६८, ९५९९६७६९५३, ८८८२३५६८०३ या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन एनटीएच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!