Friday, April 26, 2024
Homeनाशिकशहरात करोना बाधीतांचा आकडा २५० तर प्रतिबंधीत क्षेत्र ६० वर

शहरात करोना बाधीतांचा आकडा २५० तर प्रतिबंधीत क्षेत्र ६० वर

नाशिक : शहरात करोना बाधीत क्षेत्रातून येणार्‍यांची संख्या ३ हजारावर गेली आहे. तसेच स्थानिक बाधींच्या संपर्कातून आणि बाहेरगावी जाऊन आल्यानंतर झालेल्या संपर्कातून नाशिक शहरातील करोना रुग्णांत लक्षणि वाढ झाली आहे. परिणामी करोना रुग्णांचा आकडा वेगात वाढत असुन मंगळवारी (दि.२) करोना बाधीतांचा आकडा २५० पर्यत गेला असुन मृताचा आकडा ११ झाला आहे.

करोना संशयित रुग्णांचा आकडा वाढत असुन २५ मे ते २ जुन या कालावधीत ९४५ संशयितांना शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असले तरी यातील निगेटीव्ह अहवाल आल्यानंतर सर्वांना घरी सोडण्यात आले आहे.

- Advertisement -

मंगळवारपर्यत रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांची संख्या केवळ २७८ इतकी होती. रविवारी ३६ करोना रुग्ण, सोमवारी २० आणि मंगळवारी (दि.२) नवीन १३ रुग्ण आढळून आल्याने नाशिक महापालिका क्षेत्रातील बाधीत रुग्णांची संख्या २५० इतकी झाली आहे. तसेच पंचवटीतील बीडी कामगारनगर येथील व्यापारी असलेल्या व्यक्तीचा करोनामुळे मृत्यु झाल्याने शहरातील मृतांचा आकडा आता ११ झाला आहे.

मंगळवारी (दि.२)सायंकाळी ५ वाजता महापालिका आरोग्य विभागाकडे ३ बाधीत रुग्णांची माहिती प्राप्त झाली होती. यात बीडी कामगार अमृतधाम पंचवटी येथील ५७ वर्षीय पुरुषाचा उपचार सुरू असतांना मृत्यु झाला, समर्थनगर किशोर सुर्यवंशी रोड येथील ६६ वर्षीय व्यक्ती (या व्यक्तीच्या कुटुबांतील व्यक्ती मार्केट यार्डात कामाला आहे.),गंगापूररोड भागातील शर्मिला अपार्टमेंट येथील ३७ वर्षीय पुरुष यांचा समावेश होता.

त्यानंतर रात्री ८ वाजता आलेल्या अहवालातून १३ जणांना करोना झाल्याचे समोर आले. यात सातपूर राजवाडा भागातील १२ वर्षीय मुलगी, दोंदे मळा पाथर्डी फाटा भागातील ८ वर्षाचा मुलगा, नाशिकरोड येथील ६४ वर्षीय पुरुष, गोसावीवाडी नाशिकरोड येथील ३९ वर्षीय पुरुष व १२ वर्षाची मुलगी, पेठरोड पंचवटी भागातील ५३ व २१ वर्षीय पुरुष, मायको दवाखाना पंचवटी येथील ३८ वर्षीय पुरुष व २९ वर्षीय महिला, कलानगर दिंडोरीरोड येथील ३३ वर्षीय महिला, समतानगर टाकळी येथील ५ वर्षय पुरुष व वीर सावरकरनगर नवीन नाशिक येथील ७० वर्षीय वृध्द अशा १३ जणांचा समावेश आहे. अशाप्रकारे सोमवारी दिवसभरात महापालिका क्षेत्रातील बाधीतांचा आकडा २५० झाला आहे.

दरम्यान शहरात आजपर्यत करोना बाधीत भागातून आलेल्याची संख्या ३१६३ झाली असुन यातील ९४५ जणांचा देखरेखीखालील १४ दिवसाचा कालावधी पुर्ण झाला आहे. आत्तापर्यत शहरातील रुग्णालयात ३१६३ संशयितांना दाखल करण्यात आल्यानंतर उपचार झाल्यानंतर २९०९ जणांना घरी सोडण्यात आले.

दरम्यान ६ एप्रिल ते २ जुन २०२० या कालावधीत शहरात २५० रुग्ण आढळून आले असुन रुग्ण राहत असलेल्या घराजवळील परिसर असे एकुण ९२ भाग आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन जाहीर केले होते. यातील ३३ प्रतिबंधीत क्षेत्रात नव्याने करोना रुग्ण आढळून न आल्याने याठिकाणचे निर्बंध पुर्णपणे हटविण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या