नाशिक रनला धावणार १५ हजार नाशिककर; पहिल्यांदाच दहा किमीची ‘मॅरेथॉन’

सातपूर : समाजातील गरजू घटकांच्या मदतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने यावर्षी देखील दि.11जानेवारीला बहूचर्चित अठराव्या नाशिक रनचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष एच.एस.बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बॉश कंपनीच्या गेस्ट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत नाशिक रन विषयी माहिती देतांना सांगितले की, जानेवारी 2003 साली समाजातील मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित व गरजू घटकांचा विकास डोळ्यासमोर ठेऊन त्यांच्या गरजा लक्षात घेऊन समविचारी उद्योग घटकांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन नाशिक रनची कल्पना उदयास आली.जानेवारी 2003 साली पहिल्या नाशिक रनची मुहूर्तमेढ रोवली गेली.मागील वर्षी विविध प्रकल्पांना ट्रस्टच्या वतीने मदत देण्यात आली आहे.तर मागील वर्षी जवळपास 84 लाख रुपयांचा निधी संकलित झाला होता. त्याचवेळी 1लाख 75 हजार रुपयांची मदत विवीध समाज घटकांना उभारुन देण्यात आली.

यावर्षी 18 व्या नाशिक रनचे आयोजन 11 जानेवारीला सकाळी 7.30 वाजता महात्मनगर क्रीडांगणापासून सुरुवात होणार आहे. नोंदणी केलेल्यासाठी लकी ड्रॉ चे आयोजन केले असल्याची माहिती उपाध्यक्ष रमेश जी.आर. यांनी दिली.

पहिल्यांदा मॅरेथॉन रेस स्पर्धा
नाशिकरन स्पर्धेपूर्वी म्हणजे सकाळी 6.30 वाजता महात्मानगर मैदानावरून नाशिक रन चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून 10 कि.मी.च्या ‘मॅरेथॉन’ स्पर्धेला प्रारंभ केला जाणार आहे. ही रेस 7.30 वाजता संपवण्यात येणार आहे. या रेसमध्ये सहभाग घेण्यासाठी ७५० रुपये प्रवेश फी ठेवण्यात आलेली आहे.

या स्पर्धेसाठी नेमण्यात आलेल्या वयोगटात 15 ते 30, 30 ते 50 व 50 च्या पूढे असे स्त्री व पुुरुष असे वेगवेगऴे गट राहणार आहे. या स्पर्धात विजयी होणार्‍या सर्व गटातील 15 विजेत्याना रु.7000/-, रु. 5000/-,3000/-असे रोख पूरस्कार दिले जाणार आहेत.