देवळा : पिळकोसला शॉर्टसर्किटमुळे मक्याचा भुसा जळून खाक

देवळा : पिळकोसला शॉर्टसर्किटमुळे मक्याचा भुसा जळून खाक

खामखेडा : कळवण तालुक्यातील पिळकोस येथे मका काढणीचे काम  सुरु असताना पिकावरून गेलेल्या वीजवाहक तारांचा अचानक  शॉक सर्किट झाल्याने आग लागली. मका मळणी यंत्रातून निघणाऱ्या भूशा ने पेट घेतला. त्याचबरोबर मळणी यंत्रानेही पेट घेतल्याने मजुरांची तारांबळ उडाली.

पिळकोस येथील शेतकरी संजय जाधव  यांच्या शेतात मका काढणी सुरु असताना त्याच्या खळ्यातुन गेलेल्या लोंबकळणाऱ्या   वीजवाहक तारांचा शॉक सर्किट झाला. या शॉर्ट सर्किटमुळे मका पिकाच्या भुसाला आग लागली. भुसा ची आग विझवत असताना मळणी यंत्रानेही पेट घेतला. यावेळेस मळणीयंत्रावर काम करणाऱ्या मजुरांची आरडाओरड एकून शेजारील शेतकरी मोठ्या धावून आले. दोन्ही ठिकाणी लागलेली आग विझवण्यास सुरवात केली. काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात शेतकऱ्यांना यश आले.

या दुर्घटनेत मळणी यंत्रावर काम करणाऱ्या मजुरांना कुठलीही इजा झाली नसून शेतकऱ्यांच्या व तरुणाच्या सतर्कतेमुळे आज मळणी यंत्र त्याला जोडलेलं ट्रॅक्टर सुरक्षित राहिले यात फक्त शेतकऱ्याचा जनावरांसाठी चारा म्हणुन निघालेला भुसा आगीत भस्म झाला व मळणी यंत्राचे किरकोळ नुकसान झाले आहे.

महावितरण कंपनी च्या वीजवाहक तारा शिवारात ह्या जीर्ण झालेल्या असून बऱ्याच ठिकाणी त्या खाली आल्या असून महावितरण कडून देखभाल दुरस्ती झालेली नसल्यामुळे परिसरात असे अपघात घडत असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला. पावसाळा लागण्या पूर्वी संपूर्ण शिवारातील वीजवाहक तारांची उंची वाढवण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.

दोन वर्षापूर्वी मक्याच्या पिकाला पाणी देत असताना लोंबकळणाऱ्या वीजवाहक तारा वाढलेल्या मकाच्या झाडाला लागून शॉक लागल्याची घटना घडली होती. आताही विजवाहक तारा खाली आल्या असून महावितरण कंपनीने भविष्यात मोठी दुर्घटनेची वाट न पाहता वीजवाहक तारांची उंची वाढवावी.
– संजय जाधव, शेतकरी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com