Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर : मुंबईच्या वडाळा भागातून आलेले दहा जण पोलिसांच्या ताब्यात; निवारा केंद्रात रवानगी

Share

सिन्नर : देशभरात संचारबंदी लागू असताना मुंबईच्या वडाळा भागातून दोन कारमधून उत्तर प्रदेश कडे निघालेल्या दहा जणांना सिन्नर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान घोटी सिन्नर महामार्गावरील बेलू फाट्याजवळ असणाऱ्या चेक पोस्टवर त्यांना पकडले असून त्यांच्याविरोधात प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सिन्नर घोटी महामार्गावरील बेलु येथील चेक पोस्टवर आज( दि. ११) दुपारी एक पंचेचाळीस वाजताच्या दरम्यान काळीपिवळी लेट बीट कार क्र. एम एच ०२ डी क्यू ८५५ व हुंडाई सेंट्रो कार क्र. एम एच ०१ बीटी २९४१ पकडण्यात आल्या. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते उत्तर प्रदेश कडे निघाले असल्याची माहिती त्यांनी दिली . देशभरात कोरोनाच्या संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण होण्यासाठी संचारबंदी लागू असल्याची माहिती असतानाही या आदेशाचे उल्लंघन करून मास्क न लावता उत्तर प्रदेशातील अलाहाबादकडे हे दहा जण प्रवास करीत असल्याचे स्पष्ट झाले.

महम्मद तलहा मुजिबु लला, रणजान आजम अली, वासिम अली जहुर अली, बाशिद अहमद फरीद अहमद, समीर निजामुद्दीन अहमद, मोहम्मद हनीफ अब्दुल माजिद खान, सादुल्ला अब्दुल जलील खान, जाहीर उद्दीन अब्दुल मजीद खान, मोहम्मद अली खान सलाम अली खान, मोहम्मद जाफरखान मोमान अत्तार खान या सर्वांना ताब्यात घेतले व त्यांच्या दोन्ही कार जप्त करण्यात आल्या आहेत.

या सर्वांना पोलिसांनी नांदूर येथील निवारा केंद्रात हलवले आहे. तत्पूर्वी या नागरिकांची कोणतीही टेस्ट न करता या दहा जणांना तेथे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!