Friday, April 26, 2024
Homeनाशिकसप्तशृंगीगड : लॉकडाऊनच्या काळात भुरट्या चोरांचा धुमाकूळ

सप्तशृंगीगड : लॉकडाऊनच्या काळात भुरट्या चोरांचा धुमाकूळ

सप्तशृंगीगड : लॉकडाऊनच्या काळात सप्तशृंगी परिसरात चोरांनी धुमाकूळ घातला आहे. नुकतेच येथून एक पाण्याची मोटार पोलिसांनी लांबवली आहे.

सध्या लॉक डाऊनचा काळ असला तरी शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील गुन्हे घडत आहेत. येथील एअरटेल टावर नजीकच शिंदे बापू यांचा घराचा काम चालू आहे. त्या ठिकाणी पाण्याची मोटर चोरांनी ब्लेडचे साह्याने नळी कापून मोटर लंपास केली आहे. विशेष म्हणजे सप्तशृंगी गडावर पोलीस चौकी असून सुद्धा चोरांची हिम्मत वाढल्याचे समोर आले आहे. या पोलीस चौकीत एक पोलीस कर्मचारी राहणे गरजेचे आहे.

- Advertisement -

सप्तशृंगीगड सह संपूर्ण परिसरात चोऱ्याच्या प्रमाणात वाढ होत असून कळवण पोलीस विभागाने अशा भुरट्या चोरांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

अशा भुरट्या चोरांवर जर वेळीस आळा घातला नाही तर सदर परीसरातील चोऱ्यांच्या प्रमाणात कमालीची वाढ होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत असून तातडीने अशा भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परीसरात जोर धरत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या