Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर : उजनी येथील इसमाचा संशयास्पद मृत्यू

Share
सिन्नर : उजनी येथील इसमाचा संशयास्पद मृत्यू Latest News Nashik Suspected Death of 25 Year Old Man at Sinnar

सिन्नर : तालुक्यातील उजनी येथे २५ वर्ष वय असलेल्या इसमाचा मृतदेह विहरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संजय भाऊसाहेब हाके (वय २५) असे मृताचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, उजनी शिवारातील शेतकरी पुंडलिक पवार नेहमेप्रमाणे शेतावरील विद्युतपंप चालू करण्यासाठी गेले असता (दि. ०९) अज्ञात इसमाचा मृतदेह विहरीत आढळून आला. पवार यांनी लागलीच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. सरम्यान आज (दि. १०) सकाळी मुसळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी लावणे, पोलीस हवालदार राम भवर, बालाजी सोमवंशी यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला.

सदर मृतदेहाची ओळख पटली असून मृत इसम हा यूजीन गावातीलच असल्याचे निदर्शनास आले आहे. मृत व्यक्ती गेल्या चार ते पाच दिवसांपासून बेपत्ता होती. त्यामुळे सदर घटना आत्महत्या कि हत्या हे कळू शकलेले नाही. या घटनेचा पुढील तपास पोळी करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!