Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

PhotoGallary : पोलीस अधीक्षक आरती सिंग यांच्याकडून हरीहर किल्ला सर

Share
पोलीस अधीक्षक आरती सिंग यांच्याकडून हरीहर किल्ला सर Latest News Nashik Superintendent of Police Aarti Singh Achieved Harihar Fort

इगतपुरी । गुलाबी थंडी, हिरवी गर्द झाडी, नागमोडी पाऊल वाट, बिकट चढाई अन ८० कोनाच्या सरळ रेषेत जाऊन काही आभाळात घुसणारी वाट …अशा प्रकारे क्षणाक्षणाला साहस आणि धैर्याची परीक्षा घेणारा हरिहर गड नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक आरती सिंग यांनी सर केला.

हरिहर किल्ला सर करण्यासाठी निमित्त होते, पोलीस रायझिंग डेचे. या निमित्ताने ग्रामीण पोलीस अधीक्षक आरती सिह यांच्या संकल्पनेतून या हरिहर किल्ला सफरीचे आयोजन करण्यात आले होते. या मोहीमचे आयोजन शर्मिला धारगे -वालावकर तसेच पेठ , त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, घोटी येथील पोलीस अधिकाऱ्यांनी केले होते.

यांच्यासह या मोहिमेत उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडिले, सदाशिव वाघमारे, श्रीमती अरुंधती राणे यांचेसह पोलीस अधिकारी यांनी सहभाग घेत गडकिल्ल्याची मोहीम फत्ते केली.

यावेळी पोळी अधीक्षक आरती सिंग यांनी अगदी कमी वेळात किल्ला सर करून सर्वांना चकित केले. या मोहिमेत मेढे पाटील, देवचंद महाले, संजय चव्हाण, संपत मुर्तडक, दत्ता लिलके, दिवे आदींचा सहभाग होता.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!