Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

आर्टिलरी सेंटरचे जवान सुनील कुमार ठरले मविप्र मॅरेथॉनचे विजेते; पहिल्याच प्रयत्नात यश

Share
आर्टिलरी सेंटरचे जवान सुनील कुमार ठरले मविप्र मॅरेथॉनचे विजेते; पहिल्याच प्रयत्नात यश Latest News Nashik Sunil Kumar of Artillery Center Soldier wins MVP Marathon 2020

नाशिक : मराठा विद्या प्रसारक संस्थेतर्फे आयोजित सातव्या राष्ट्रीय आणि १२ राज्यस्तरीय मविप्र मॅरेथॉन स्पर्धेत राजस्थानच्या सुनील नील कुमार याने विजेतेपद पटकावले. त्याने २ तास २८ मिनिटे आणि २५ सेकंदात ४२ किमीची मॅरेथॉन पूर्ण केली.

सुनील कुमार हे नाशिक आर्टिलरी सेंटरचे जवान असून त्यांनी पहिल्याच प्रयत्नात हि मॅरेथॉन पूर्ण केली आहे. मॅरेथॉनच्या सह्भागाआधी केवळ एक महिना सर्व करीत हि मॅरेथॉन जिंकली आहे. सुनील कुमार मूळचे राजस्थान येथील असून बॅच नं. १०६ चे जवान आहेत.

नाशिकच्या गुलाबी थंडीतही हजारो स्पर्धकांनी सहभाग नोंदवत उत्साही वातावरणात हि स्पर्धा झाली. गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौक येथून सकाळी ६ वाजता मॅरेथॉन स्पर्धेला सुरवात झाली. यात शाळकरी विद्यार्थ्यांसोबत राष्ट्रीय धावपटूंनी सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी ऑलम्पिकपटू अजित लाक्रा, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील मविप्र संस्थेच्या सरचिटणीस तसेच आयोजन समितीचे पदाधिकारीव संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान दरवर्षीप्रमाणे यंदाही मॅरेथॉन स्पर्धेत चुरस पाहावयास मिळाली. यंदाच्या ४२ किमी स्पर्धेत राजस्थानच्या सुनील नील कुणार याने प्रथम क्रमांक पटकावला तर दुसऱ्या क्रमांकावर नागपूरचा देवेंद्र रामसिंग चिखलोंढे, तिसऱ्या क्रमांकावर उत्तरप्रदेशातील अंकुर निल कुमार होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!