Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी : बलायदुरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Share

इगतपुरी : तालुक्यातील बलायदुरी येथील विवाहीत महीलेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बलायदुरी येथील पद्ममा प्रकाश भगत (२५) या विवाहीत महीलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती महिलेचा दिर गजानन काळू भगत यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.

गजानन भगत यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार, दि. १० एप्रिल रोजी भाऊ प्रकाश भगत, मयत भावजय पद्ममा भगत व आमच्या कुटुंबाने एकत्र जेवण केले. त्यानंतर रात्री भाऊ व त्याची पत्नी रुममध्ये झोपावयास निघुन गेल्याने आम्हीपण झोपी गेलो.

त्यानंतर रात्री साडेबारा वाजेनंतर कुठल्यातरी कारणाने पद्मजा हिने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या का केली याचे अद्याप कारण समजु शकले नाही. याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिंदे, महीला पोलीस हवालदार कल्पना जगताप करीत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!