इगतपुरी : जेएनयु प्रकरणी ‘सम्यक’चे तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन

इगतपुरी : जेएनयु प्रकरणी ‘सम्यक’चे तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन

इगतपुरी । जेएनयू मध्ये झालेल्या हिंसाचारानंतर देशासह राज्यात संतापाची लाट उसळली आहे. याबाबत इगतपुरी तहसील कार्यालयाबाहेर वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौध्द महासभा व सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या पदाधिकारींनी एक दिवसीय धरणे आंदोलन करीत नायब तहसीलदार महादेव कारंडे यांना निवेदन दिले.

दरम्यान तहसील कार्यालयाबाहेर आम्ही सारे नागवंशीय कलापथक शाहिरी जलशाच्या माध्यमातुन जेएनयू येथील  विद्यार्थी हल्याचा व केंद्र सरकारचा निषेध केला. जवाहरलाल नेहरु सारख्या देशातील नामवंत विद्यापिठात जर मुलींच्या वस्ती गृहात घुसुन जर नकाबधारी गुंड हल्ला करीत असतील तर या गोष्टीचा निषेध करावा तितका थोडा आहे. हल्ला झाल्यानंतर या हल्ल्याचे समर्थन करणाऱ्या आर. एस. एस. प्रणित हिंदु महासभा, अभाविप सारख्या संघटनांना लोकशाही देशात थारा नाही. त्यांच्यावर त्वरीत बंदी घालावी व हल्ला करणाऱ्या गुंडावर त्वरीत कारवाई करावी असा इशारा निवेदनात दिला आहे.

या आंदोलनात कालपथकाचे शाहीर संविधान गायकवाड , किरण निकम तसेच बहुजन वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष विक्रम जगताप, शहराध्यक्ष सचिन चोपडे, सम्यक विद्यार्थी आंदोलनचे जिल्हा उपाध्यक्ष गिरीश वानखेडे यासह मोठ्या संख्येने कायकर्ते यावेळी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com