Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सुरक्षित प्रवास हेच एसटीचे प्रमुख ध्येय; ११ जानेवारीपासून सुरक्षा अभियान

Share
सुरक्षित प्रवास हेच एसटीचे प्रमुख ध्येय; ११ जानेवारीपासून सुरक्षा अभियान Latest News Nashik ST's Security Campaign From January 11

मुंबई : राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या निर्देशानुसार व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटीमध्ये ११ जानेवारी ते २५ जानेवारी २०२० दरम्यान सुरक्षितता मोहीम राबवली जात आहे . दररोज सुमारे ६५ लाख प्रवाशांना दळणवळणाची सुरक्षित सेवा देणारी एसटी महाराष्ट्राची लोकवाहिनी बनली आहे. गेल्या ७१ वर्षात अविरत आणि सुरक्षित सेवेच्या माध्यमातून प्रवाशांच्या मनात एसटीबद्दल विश्वासाह॔ततेची भावना निर्माण झाली आहे . या विश्वासाला बळकटी देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळामध्ये दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये सुरक्षितता मोहीम राबविण्यात येते.

या मोहिमे दरम्यान चालकांचे प्रबोधन , प्रशिक्षण,आरोग्य तपासणी ,वाहन परवाना तपासणी ,गाड्यांची तांत्रिक तंदुरुस्ती अशा अनेक बाबींवर भर दिला जातो .सध्या महाराष्ट्रात एसटीमध्ये सुमारे ३४ हजार चालक कार्यरत आहेत .अपघाताची विविध कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने एसटीने चालकांसाठी वेळोवेळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे.

अपघात विरहित सेवा बजावणाऱ्या चालकांना रोख बक्षिसे देऊन राष्ट्रीय सणाच्या दिवशी गौरवण्यात येते, चालकांना सुरक्षित प्रवासाचे महत्व पटवून देण्याबरोबरच त्यांचे मानसिक संतुलन सुदृढ करण्याच्या दृष्टीने आगार पातळीवर समुपदेशन देखील करण्यात येत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून गेल्या काही वर्षात इतर प्रवासी वाहनांच्या तुलनेत एसटी च्या अपघातांची संख्या नगण्य आहे.

या सुरक्षितता मोहिमेच्या पार्श्वभूमीवर “प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी, वाहतुकीचे नियमाचे पालन, उत्तम शरीर प्रकृती आणि मन:स्वास्थ्य ” या चतुसुत्रीचे पालन करीत एसटीच्या चालकांनी यंदाच्या वर्षांमध्ये सर्वसामान्य जनतेला अपघात विरहित सेवा देण्याचे आवाहन एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री रणजीत सिंह देओल यांनी एका आवाहन पत्रकाद्वारे केले आहे .

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!