Type to search

नाशिक

दिंडोरी : लखमापूरमध्ये कडकडीत बंद; नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

Share
दिंडोरी : लखमापूरमध्ये कडकडीत बंद; नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद Latest News Nashik Strictly Closed in Lakhmapur In Dindori Taluaka

लखमापूर : पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला लखमापूर येथील नागरिकांनी कडकडीत बंद पाळत प्रचंड प्रतिसाद दिला. येथील व्यापारी, दुकानदार, कंपनी मालक यांनी सहभाग घेत बंद पाळला .

दरम्यान कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी देशभरातील नागरिकांना आवाहन केले होते. त्या पार्श्वभूमीवर आज देशभरात जनता कर्फ्यू लागू आहे. या आवाहनाला दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून आपल्यासाठी व इतरांसाठी सर्वानी सहभाग दिला आहे.

येथील ग्रामपंचायतीने यापूर्वीच स्थानिक दुकानदारांना नोटीस देत बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. तसेच लखमापूर औद्योगिक वसाहतीत गोदावरी पेपर मिल, एव्हरेस्ट इंडस्ट्रीज कंपनी आजच्या जनता कर्फ्यु मध्ये सहभागी असल्याचे कार्मिक व्यवस्थापक योगेश अहिरे,तसेच गोदावरी पेपर मिल चे कार्मिक व्यवस्थापक सोमठानकर यांनी ही माहिती दिली.

तसेच लखमापूर फाटा येथील माऊली हॉस्पिटल आणि मेडिकल स्टोअर्स वगळता, इतर कंपनी ,सर्व व्यापारी दुकाने बंद आहेत .यामुळे रस्त्यावर शुकशुकाट बघायला मिळत आहे. यावेळी वणी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण पाडवी यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस कर्मचारी रामकृष्ण सोनवणे, गोपाळ भोई, कुणाल मराठे, सुमित जाधव यांनी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!