Thursday, April 25, 2024
Homeनाशिकदेवळा : राज्य ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून कोरोनाग्रस्तांना सहा कोटीची मदत

देवळा : राज्य ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून कोरोनाग्रस्तांना सहा कोटीची मदत

वाजगाव : राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी ग्रामपंचायत कमर्चारी वर्गाने आपल्या पगारातील प्रत्येकी एक हजार रुपये मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याचा निर्णय घेतला असुन याची परस्पर ऑनलाईन वेतनातून कपात करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कमर्चारी (आयटक सलग्न) महासंघाचे राज्यध्यक्ष कॉ.तानाजी ठोंबरे, सरचिटणीस कॉ.नामदेव चव्हाण, सचिव सखाराम दुर्गुडे यांनी एक पत्रकाद्वारे मुख्यमंत्री व ग्रामविकासमंत्री यांचेकडे केली आहे.

दरम्यान सध्या कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिकट होत असताना मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अनेक हात सरसावले आहेत. यासाठीच राज्यातील ग्रामपंचायत कामगारांनी आपल्या वेतनातून एक हजार रुपये कोरोनाच्या लढाईसाठी देण्यात येत आहे. कोरोनाच्या लढाईत डॉक्टर, नर्सेस, पोलीस, सफाई कर्मचारी आदि सर्वजण स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनाग्रस्तांना वाचविण्यासाठी अथांग प्रयत्न करत आहेत.

- Advertisement -

यासाठी राज्यातील ग्रामपंचायतीच्या ६० हजार कर्मचारी सरसावले आहेत. याचबरोबर आकृती बंधाबाहेरील कर्मचाऱ्याचा प्रत्येकी ५०० रुपयाच्या निधीसाठी गटविकास अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचे पुढाकार घेवून निधी एकत्रित करण्यात यावा अशी विनंती केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या