Thursday, April 25, 2024
Homeनाशिकआयुक्तांच्या उपस्थितीत स्थायी समिती सभा; २ पुलांसह सुमारे ५० कोटींच्या विकास कामांना...

आयुक्तांच्या उपस्थितीत स्थायी समिती सभा; २ पुलांसह सुमारे ५० कोटींच्या विकास कामांना मंजुरी

नाशिक : करोना साथीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा अद्याप संपलेला नसुन गेल्या दोन महिन्याच्या काळात नाशिक महापालिकेची विविध कामांना ब्र्रेक लागला आहे. महासभेने मंजुर केलेले विषय स्थायीच्या मंजुरीच्या प्रतिक्षेत असतांना आज (दि.19) झालेल्या स्थायीच्या बैठकीत मार्गी लागली आहे.

सभापती गणेश गिते यांनी दोन पुलांसह विविध विकास कामांचे सुमारे 50 कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. करोनाच्या पार्श्वभूमीवर महासभा रद्द करण्यात आली असतांना आज स्थायीची सभा आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या उपस्थित पार पडली.

- Advertisement -

करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने बैठका व सभा घेण्यास मनाई करण्यात आली असल्याच्या कारणावरुन महापौर सतिश कुलकर्णी यांनी बोलविलेली दि. 20 मे रोजीची महाकवि कालिदास कलामंदीरातील नियोजीत महासभा रद्द केली. मात्र महापालिकेची स्थायी समितीचे सदस्य 16 असल्याने ही सभा महासभा होत असलेल्या मुख्य सभागृहात घेण्यात आली.

आयुक्तांच्या उपस्थित आणि सभापती गणेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली पहिली सभा आज झाली. यासभेवर प्रशासनाकडुन जादा विषयासह सुमारे 84 विषय ठेवण्यात आले होते. यात प्रभाग 26 मध्ये नदीवर पुल बांधण्यासाठी 3.19 कोटी रुपयांच्या खचार्र्स व करारनामा करण्यास आणि प्रभाग 8 मधील जेहारन सर्कल ते गोदावरी नदीपर्यत असलेल्या रस्त्यावर पुढे नदीवर पुल बांधण्यासाठी 17.94 लाख रुपये खर्चास करारनामा करण्यास सभापतींनी मान्यता दिली.

तसेच प्रभाग 23 मध्ये के. के. वाघ शाळेजवळ क्रीडा संकुल उभारणीसाठी 2 कोटी रु. खर्चास मंजुरी देण्यात आली. तसेच महापालिकेच्या विविध विभागासाठी सुरक्षेच्या दृष्टीने कार्यरत असलेल्या ना. जि. सुरक्षा मंडळ आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या सुरक्षा रक्षकांच्या कामांच्या खर्च, जाहीरात खर्च, तसेच शहरातील मलनिस्सारण व पाणी पुरवठा कामे, टाकळी व कपिला एसटीपी देखभाल आदीसह विकास कामांना सभापतींनी मंजुरी दिली.

तसेच शहरातील वाहतुक बेटे, महामार्गावर उड्डाण पुलाखालील दुभाजक सुशोभीकरणासाठी एक्सप्रेस ऑफ इंटरेस अंतर्गत 10 वर्षासाठी खाजगी संस्थासोबत करारनामा करणे, शहरातील धोकादायक झाडांचा विस्तार कमी करण्यासाठी ठराविक दरांनी सहा विभागासाठी कामे देणे आदीसह कामांना सभापतींनी मंजुरी दिली.

अभियंता सोनवणेंचे अपिल प्रस्ताव आयुक्तांकडे…
आजच्या स्थायी सभेत प्रशासनाकडुन बडतर्फ करण्यात आलेले अभियंता रविकिरण सोनवणे यांच्या अपिलावर चर्चा झाली. यात शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी

- Advertisment -

ताज्या बातम्या