Tuesday, May 14, 2024
Homeनाशिकमखमलाबाद बसस्टँड चौकात कोरोनाविषयीे जनजागृतीचा अनोखा उपक्रम

मखमलाबाद बसस्टँड चौकात कोरोनाविषयीे जनजागृतीचा अनोखा उपक्रम

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मखमलाबाद येथे बसस्टँडवरील चौकात राक्षसरुपी कोरोना विषाणूसंबंधीचे भव्यचित्र साकारण्यात आले आहे. तसेच घरीच रहा, सुरक्षित रहा, प्रशासनास सहकार्य करा, कोरोना – कोई रोडपर ना निकले या घोषवाक्यांद्वारे जनतेमध्ये जनजागृती केली आहे.

जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसचा अटकाव करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. नाशिक शहरातही कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. त्यानुसार शहरासह लगतच्या गावांनाही जनजागृती करणयात येत आहे.

- Advertisement -

मखमलाबाद येथे जनजागृती करण्यासाठी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन पिंगळे यांच्या संकल्पनेतून येथील माध्यमिक विद्यालयाचे चित्रकला शिक्षक सोमेश्वर मुळाणे, सुधीर तांबे, दत्तात्रय पवार, देवदत्त राऊत, प्रविण शिंदे, गणेश शेळके यांनी कोरोनाविषयक जनजागृतीपर चित्र रस्त्यावर रंगविले.

याप्रसंगी मविप्र समाज संस्थेचे पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या