Thursday, April 25, 2024
Homeनाशिकउद्यापासून स्मार्टरोड वाहतुकीसाठी खुला; ‘या’ सुविधांनी सुसज्ज

उद्यापासून स्मार्टरोड वाहतुकीसाठी खुला; ‘या’ सुविधांनी सुसज्ज

नाशिक : नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट अंतर्गत अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका हा स्मार्ट रोड रविवारी दिनांक 26 जानेवारी, 2020 रोजी वाहतुकीसाठी खुला होणार आहे. गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या स्मार्ट रोडचे काम अद्यापही काही ठिकाणी चालू आहे. परंतु उद्या या स्मार्टरोडच्या उदघाटनाचा कार्यक्रम असून त्यानंतर अधिकृतरीत्या स्मार्टरोड वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

सीबीएस ते अशोकस्तंभ हा स्मार्ट रॉड विविध सुविधांनी सुसज्ज असणार आहे. यासाठी अनेक उपक्रम या रस्त्यावर राबविण्यात येत आहेत. त्यापैकी काही उपक्रम पूर्ण झाले असून काह प्रगतीपथावर आहेत. या सर्व सुविधा नेमक्या कोणत्या आहेत व कशा आहेत यासंदर्भात घेतलेला आढावा पाहुयात …..

- Advertisement -

या महत्वाच्या सुविधा

ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस
स्मार्टररोडवर जेष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा करण्यात आली असून त्यामध्ये जेष्ठांना बसण्यासाठी बेंचेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

स्मार्ट किऑस्क, ई-टॉयलेटची सुविधा उपलब्ध
स्मार्टरोडचे विशेष म्हणजे या एक किमीच्या अंतरात नागरिकांसाठी ई-टॉयलेटची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. स्मार्ट रोडवर चार ठिकाणी म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ दोन तर सीबीएस येथे दोन ई टॉयलेट्स बसविण्यात आले आहेत.

संपूर्ण रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे
स्मार्ट रोडवर आयटीएमएससह एएनपीआर, आरएलव्हीडी, फिक्स बॉक्स आणि पीटीझेड कॅमेराज् असे 27 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत, तसेच पब्लिक ॲड्रेस सिस्टम एन्व्हायरमेंट सेंसर्स बसविण्यात येत आहेत.

स्मार्ट पोल, वाय-फाय सुविधा, सोलर पॅनल
स्मरतरोडवर नागरिकांसाठी मोफत वायफाय ची सुविधा करण्यात येणार आहे. या अंतर्गत नागरिकांकडून माफक शुल्कही आकारले जाणार आहे. तसेच या ठिकाणी सोलर पॅनलची व्यवस्था करण्यात येणार आहे.

रस्त्याच्या दुतर्फा एक मीटर रुंदीचा सायकल ट्रॅक
सकाळच्या सुमारास व सायंकाळी जॉगिंग करणाऱ्यांसाठी वेगळा रस्त्याच्या दुतर्फा एक मीटर रुंदीचा सायकल ट्रॅक
देण्यात आला आहे.

अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका दरम्यान फूटपाथ
गर्दीच्यावेळी येथे पायी चालणाऱ्यांना आरामशीर चालता येणार आहे. तसेच अंधांसाठी विशिष्ट प्रकारची व्यवस्था केल्यामुळे या फूटपाथवर चालताना त्यांनाही सोईचे होणार आहे.

भूम‌गित विद्युततारांची व्यवस्था
स्मार्टरोडवर भूमिगत विद्युततारांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे रस्त्यावर दिसणारे विद्युततारांचे जाळे दिसणार नाही.

दुचाकी पार्किंगची स्वंतत्र व्यवस्था
स्मार्ट पार्किंग प्रमाणेच स्मार्ट रोडवर दुचाकी पार्किंगची स्वंतत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

दुतर्फा डक्ट तयार केले जाणार
रस्त्याच्या दुतर्फा काही अंतरावर डक्ट देण्यात आले आहेत, त्या डक्टच्या मदतीने त्या वायर्सचा काही प्रोब्लेम झाला तर तो सोडवला जाईल. त्यामध्ये एमएसईबी, बीएसएनएल आणि इतर वायर्सचा समावेश आहे. याचाच अर्थ की पुन्हा पुन्हा रस्ता फोडावा लागणार नाही. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनसह सीवर सिस्टीमचीही अशीच व्यवस्था करण्यात आली आहे.

तीनही चौकांत इंटेलिजंट ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा

आयटीएमएस : आयटीएमएस म्हणजे इंटीग्रेटेड ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम. वाहतुकीचा अंदाज घेऊन सिग्नल कार्यान्वित होईल. थोडक्यात काय तर सिग्नलवर गाड्यांचा थांबण्याचा वेळ आवश्यकतेनुसार कमी-जास्त होईल अन् वाहतूक वेगाने होण्यात मदत होईल. सीबीएस जंक्शन, मेहेर जंक्शन आणि अशोक स्तंभावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत. एएनपीआर, आरएलव्हीडी, फिक्स बॉक्स आणि पीटीझेड कॅमेराज् या दोन्ही ठिकाणी लावण्यात आले आहेत.

एएनपीआर कॅमेरा : म्हणजे ऑटोमेटेड नंबरप्लेट रेकग्निशन कॅमेरा, या कॅमेऱ्यामार्फत गाड्यांच्या नंबरप्लेटची नोंद ठेवण्यात येईल. त्याचा एक डाटाबेस तयार होणार आहे आणि कोणतीही घटना घडल्यास तो डाटाबेस उपयोगात येऊ शकेल. आरएलव्हीडी कॅमेरा म्हणजे रेड लाईट व्हायोलेशन डिटेक्शन सिस्टीम कॅमेरा, या कॅमेऱ्यामार्फत सिग्नल तोडणाऱ्या म्हणजेच लाल सिग्नलवर गाडी जंप करणाऱ्यांची नोंद घेतली जाईल आणि त्यानुसार गाडीच्या मालकाच्या घरी दंडाची पावती पाठवली जाईल.

फिक्स बॉक्स कॅमेरा : या कॅमेऱ्याद्वारे एका सरळ लेनमध्ये 100 मीटर आणि त्यापलिकडचा परिसर कव्हर होणार आहे. त्यामुळे या कॅमेऱ्याच्या टप्प्यात येणारी प्रत्येक घडामोड रेकॉर्ड होणार आहे.पीटीझेड कॅमेरा म्हणजे पॅन टील्ट कॅमेरा म्हणजे हा कॅमेरा 360 अंशाच्या कोनात फिरतो. तसेच इंटीग्रेटेड असल्याने या कॅमेऱ्याच्या रेंजमध्ये येणाऱ्या सर्व घटना टीपल्या जाणार आहेत.

तसेच येथे दोन्ही ठिकाणी नागरिकांना सूचना देण्यासाठी पब्लिक ॲड्रेस सिस्टीम लावण्यात आली आहे. नागरिकांना महत्त्वाची माहिती देणे त्याचबरोबर आणीबाणीच्या परिस्थितीत पब्लिक ॲड्रेस सिस्टिमची मोठी मदत होणार आहे. पर्यावरणाची विचार करता येथे एन्व्हायर्नमेंटल सेंसर्सही लावण्यात आले आहेत. याद्वारे वातावरणातील बदलासह कार्बन उत्सर्जनाबाबतही माहिती मिळणार आहे.

तसेच काही अन्य सुविधाही या स्मार्टरोडच्या माध्यमातून नागरिकांना अनुभवयास मिळणार आहे. स्टॉर्म वॉटर मेनॅजमेंट, अंडरग्राऊंड युटीलीटीज, मेडियन ॲण्ड पेडेस्ट्रीयन, स्ट्रीट लाईटींग अशा सुविधाही करण्यात आल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या