Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर

Share
ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर Latest news Nashik Singer Suresh Wadkar Announces 'Padma Shri' Award

नाशिक : आपल्या सुमधुर आवाजाने जेष्ठांसह तरुणांवर भुरळ घालणारे सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक गाण्यांना आवाज देत सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. ‘मेघा रे मेघा रे’, ‘चप्पा चप्पा चरखा चले’, ‘ए जिंदगी’, ओमकार स्वरूपा सद्गुरू समर्था, सीने में जलन आखों में तुफाँ सा क्यु हैं, सुरमयी अखियों में, ऐ जिंदगी गले लगा ले, चप्पा चप्पा चरखा चले असे अनेक सुमधूर गाणी गायली आहेत.

यासोबतच सुरेश वाडकर यांनी मराठी आणि हिंदीसह कोंकणी आणि भोजपुरी भाषेतही हजारो गाणी गायली आहेत. यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांमुळे सुरेश वाडकरांनी चाहत्यांच्या मनावर त्यांच्या आवाजाची छाप सोडली आहे.

महाराष्ट्र सरकारने २००७ मध्ये सुरेश वाडकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांचा कार्याचा गौरव केला. तसेच ‘मी सिंधुताई सपकाळ’ या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार देखील त्यांना मिळाला होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!