हरसुल : लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातही शॉर्टकट ‘शुभमंगल’चा ट्रेंड

हरसुल : लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातही शॉर्टकट ‘शुभमंगल’चा ट्रेंड

हरसूल : राज्यात आणि देशात कोरिना बाधितांची दिवसेंदिवस संख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे.यात नाशिक जिल्ह्याचाही ‘करोना बाधितां’च्या आकड्यांचा आलेख वाढत आहे. देशातील या कोरोना विषाणू च्या पाश्वभूमीवर संचारबंदीचे ही टप्पे अग्रगण्यप्रमाणे वाढविण्यात आले आहे.

यामुळे लग्न समारंभ, जमावबंदी, डीजे, संबळ वाद्य, वऱ्हाडी यासह शुभकार्यावर ही गाजावाजा न करता पडदा पडला आहे. लॉकडाऊन संचारबंदीत ग्रामीण भागातही सोशल डिस्टन्सचे नियम पाळत अगदी साधेपणात ‘शुभमंगल’ होत आहे.

नाशिक जिल्ह्यात कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्वत्र भीती परसली आहे.यात ग्रामीण भागांचाही समावेश आहे.

प्रशासनकडून अफवांवर विश्वास ठेवू नका, तसेच कोरोना बाबत मोठी जनजागृती करण्यात आली असली तरी मात्र ग्रामीण भागात कोरोनाबाबत भीतीचे सावट कायम आहे. सध्या प्रशासनाकडून काही ठराविक शुभकार्यासाठी अंबलबजावणी करण्यात आल्याने व तुरळक ग्रामीण भागात शुभविवाह होत असल्याने नातेवाईकासह वऱ्हाडी मंडळींना उपस्थित राहण्यासाठी संचारबंदी अडसर ठरत आहे.

यामुळे जवळच्या नातेवाईकानाही रक्तातील नात्यातील या विवाह सोहळ्यास हजेरी लावता येत नाही. यामुळे विवाह सोहळ्याप्रसंगी व्हिडीओ कॉलद्वारे निनावी शक्कल लढवीत नववधूना शुभेच्छा देण्यात येत आहे. अगदी साद्या आणि सोप्या पद्धस्तीने गाजावाजा न करता विवाह सोहळे ग्रामीण भागातही होत आहे. लॉकडाऊनमुळे ‘शुभमंगल सावधान’ म्हणण्याची वेळ नववधूसह मोजक्या वऱ्हाडी मंडळीवरही येत आहे.

शहराबरोबर ग्रामीण भागातही महागडे डीजे, संबळ वाद्यांना मोठी मागणी असते. हळद, आणि लग्नाच्या रात्रीला ग्रामीण भागात चालणारी वरात वाजंत्र्यासह नववधू यांना घाम फोडणारी असते. तरुणांचा या वराती मोठ्या प्रमाणावर कल असतो मात्र संचारबंदीमुळे साऱ्यांचाच हिरमोड झाला आहे.

वाजंत्र्याची अनुपस्थितीच

सध्या लॉकडाऊनमुळे लग्न शुभकार्याला अधिक शोभा देणारे आणि वऱ्हाडी मंडळीना सुराच्या तालावर ठेका धरायला लावणारे वाजत्रीविना विवाह सोहळे संपन्न होत आहे.ग्रामीण भागात एकेकाळी वऱ्हाडी मंडळींच्या वाहनांची रीघ लागलेली असायची,आणि गाडीच्या टपावर बँड, संबळ वादक अगदी ठेका धरून प्रवास करत होते मात्र संचारबंदी हे सर्व अडगळीत पडल्याचे चित्र दिसत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com