शिवकार्य गडकोटला रामशेजवर बुरुज व तट शोधण्यास यश

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक : इतिहासाच्या पाऊलखुणा जपणाऱ्या गडकिल्ल्याना नवसंजीवनी देणाऱ्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेने महिला दिनाच्या दिवशी रामशेजवर १०२ वी दुर्गसंवर्धन श्रमदान मोहीम यशस्वी केली.

या मोहिमेत किल्ल्याच्या पश्चिमेस मातीत बूजलेल्या सैनिकांच्या जोत्याला भक्कमता आणली. येथील मोठे तट व एक मोठा बुरुजही शोधून काढण्यात दुर्ग संवर्धकांना यश आले आहे.

दरम्यान या महिला दिनी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या दुर्गसंवर्धकांनी पहाटेला किल्ल्यावर चढाई केली. नेहमीप्रमाणे दुर्गसंवर्धकांनी येथील दुर्लक्षित तथा मातीत बुजलेल्या जोत्याच्या दगडांना नवरूप दिले. भूषण औटे या दुर्गसंवर्धकाने मोठ्या शिताफीने एक साबारात दडलेला बुरुज व तटाची भिंत सर्वांसमोर आणली. या मोहिमेत कोल्हापूर येथील काही दुर्गसंवर्धकांनी या कामात हातभार लावला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *