Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

आफ्रिकेतील किलीमांजरो पर्वतावर शिवरायांचा जयघोष; शिवजयंतीची पोस्ट व्हायरल

Share
आफ्रिकेतील किलीमांजरो पर्वतावर शिवरायांचा जयघोष; शिवजयंतीची पोस्ट व्हायरल Latest News Nashik ShivJayanti Celebrate at Mount Kilimanjaro in Africa

नाशिक : सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह दिसून येत असून राज्यासह देशभरात शिवजयंती उत्साहात साजरी केली जात आहे. शिवजयंतीचा ‘जय शिवाजी, जय भवानी’ हा जयघोष फक्त महाराष्ट्रातच नाही तर माऊंट किलीमांजारो पर्वतावरही घुमला होता. पुणे येथील गिर्यारोहक अनिल वाघ आणि त्यांच्या मित्रांनी २०१९ साली आफ्रिकेतील टांझानिया येथील माऊंट किलीमांजारो सर करत तिथे शिवजयंती साजरी केली होती. त्यामुळे तेथील शिवजयंतीची पोस्ट सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. .

दरम्यान शिवरायांच्या जयंती उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात येत आहे. अशाच पद्धतीने पुणे येथील गिर्यारोहक अनिल वाघ यांनी मागील वर्षी किलिमांजेरो पर्वत सर करत शिवरायांना अनोखे अभिवादन केले होते. समुद्र सपाटीपासून या पर्वताची उंची ५,८९५ मीटर एवढी आहे. चढाई करण्यासाठी गिर्यारोहकांना सहा दिवसांचा कालावधी लागला होता.

चढाई करताना गोठविणारी थंडी असतांना या गिर्यारोहकांनी इच्छाशक्तीच्या जोरावर ही मोहीम यशस्वी केली होती. या गिर्यारोहकांनी आपल्यासोबत महाराजांचा अश्वारुढ लहान पुतळातही नेला होता. शिखरमाथ्यावर पोहोचल्यावर महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत भगवा फडकवत शिवजंयती साजरी केली होती. दरम्यान आज शिवजयंतीच्या निमित्ताने या गिर्यारोहकांचा हा फोटो सध्या व्हायरल होत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!