Friday, April 26, 2024
Homeनाशिकइगतपुरी : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते शेताच्या बांधापर्यंत पोहचवणार

इगतपुरी : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते शेताच्या बांधापर्यंत पोहचवणार

बेलगाव कुऱ्हे : तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे, खते (कृषी निविष्ठा) शेताच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय कृषी विभागाने नुकताच घेतला आहे.

खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना बियाणे, खतांचा पुरवठा सुद्धा वेळेत होणे आवश्‍यक आहे .परंतु कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तालुक्यामध्ये सध्या संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रावर येऊन कृषी निविष्ठा खरेदी केल्यास मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. करोना विषाणूचा फैलाव जास्त प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisement -

यासाठी महिला बचत गट, कृषि सहायक व शेतकरी गटामार्फत कृषी निविष्ठांचा पुरवठा शेतकऱ्यांच्या बांधावर करण्याचा हितकारक निर्णय कृषी विभागाने घेतला. त्या अनुषंगने घोटी येथील गजानन कृषी सेवा केंद्रातून दौंडत या गावात करण्यात आली असून येथील शेतकरी उत्तम शिंदे व इतर शेतकऱ्यांनी 10:26:26 च्या २८ गोण्या 20:20:00:13 च्या ३० गोण्या तसेच युरिया ३२ गोण्या या शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोच दिल्या. प्रथमच कृषी निविष्ठा बांधावर उपलब्ध होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी आभार व्यक्त केले.

शासनाने ठरवून दिलेल्या रास्त दरातच कृषी निविष्ठा बळीराजाला उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कुठेही फसवणूक होणार नाही व कोरोना चा प्रादुर्भाव टाळण्यास सुद्धा मदत होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद सभापती समिती संजय बनकर व जिल्हा परिषद कृषी विभागाने केले आहे.

विविध पिकांचा उत्पादन ख़र्च कमी करुन उत्पादन वाढवने साठी तालुक्यातील प्रशिक्षित कृषि सखी, पशु सखी व बचत गटाच्या महिलांना बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करताना घ्यवयाची काळजी, बीज प्रक्रिया, माती नमूने व परीक्षण, जंगली भात निर्मूलन, दशपर्णी अर्क, जीवामृत तयार करणे बाबत नंदकुमार अहिरे, कृषिअधिकारी संदीप मोगल , देशमुख, नितिन गांगुर्डे, विनायक पारठे, बचत गटाचे मिलिंद अडसुरे व बायफचे प्रतिनिधी यानी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक करून दाखवले.

- Advertisment -

ताज्या बातम्या