Video : ‘मी आशावादी’ म्हणत सौंदर्य निर्मितीच्या कलावंतांकडून नागरिकांना उमेद

Video : ‘मी आशावादी’ म्हणत सौंदर्य निर्मितीच्या कलावंतांकडून नागरिकांना उमेद

नाशिक : करोना विषाणूच्या सावटाखाली असलेला महाराष्ट्र लॉकडाऊनमुळे घरात बसला आहे. या महामारीचा सामना अवघं जग करत आहे. त्यामुळे आपल्याही सुरक्षित राहण्यासाठी आज संचारबंदी पाळणं बंधनकारक आहे. हा लॉक डाऊन उघडणारच, अन कोरोनाला हरवणारच हा आशावाद ठेऊन शहरातील काही कलाकारांनी मिळून ‘इमोशन्स डुरिंग लॉक डाऊन’ हा युट्युबपट बनवला आहे. ‘मी आशावादी’ म्हणत एक स्पेशल व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

नाशिक स्थित सौंदर्य निर्मिती या संस्थेच्या माध्यमातून हा युट्युबपट बनवला आहे. सध्या लॉक डाऊनचा काळ असल्याने लॉकडाऊनमुळे घरातच असलेल्या सार्‍या कलाकारांनी महाराष्ट्रातील नागरिकांना उमेद देणारा हा खास व्हिडीओ घरात बसूनच शूट केला आहे.

इथे पहा व्हिडीओ : 

इमोशन्स डुरिंग लॉकडाऊन असे शीर्षक असलेल्या या शॉर्ट फिल्म चे लेखन, दिग्दर्शन, पटकथा लेखन आदिल शेख यांनी केले आहे. ही यु ट्यूब शॉर्ट फिल्म प्रदर्शित करत लॉक डाऊन दरम्यान घरघरात वसलेल्या कुटुंबाच्या भावनांना हात घालण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. जवळपास १८ मिनिटांच्या या फिल्म मधून संस्थेच्या १५ च्या वर कलाकारांचा सहभाग असून करोना मुळे लॉक झालेल्या विविध भावनांचा वेध घेत एक गोड संदेश देत नागरिकांना आशावादी राहण्यास प्रवृत्त करते.

आयुष्याच्या वाटेवर चालताना विवाह हा खूप मोठा जबाबदारीचा टप्पा असतो हा टप्पा पार पाडण्यासाठी अनेक तरुण तरुणी स्वप्नं बघत असतात नेमकं याच टप्प्यात पोहचण्याआधी नकळतपणे एक करोना रुपी राक्षस समोर येऊन आ वासून उभा राहतो.

या स्वप्नाला सत्यात उतरो न उतरो तोच गतिरोधकासारखा करोना आपल्या पुढ्यात उभे राहून आपल्याला थांबवतो. यानंतर आपल्यात नकारात्मक निर्माण होत जाते. परंतु अशा कठीण परिस्थितीत आपण स्वतःला सावरत या संकटाशी कसे दोन हात करायला हवेत, हे या शॉर्टफिल्म मधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

सदर फिल्मचे संकलन जितेंद्र सोनार यांचे असून संगीत रोहित सरोदे यांचे आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com