Friday, April 26, 2024
Homeनाशिकनिफाड : ट्रम्प वहिनी स्वयंपाकात नाशिकचा कांदा वापरा; नैताळे येथील शेतकऱ्याचे आवाहन

निफाड : ट्रम्प वहिनी स्वयंपाकात नाशिकचा कांदा वापरा; नैताळे येथील शेतकऱ्याचे आवाहन

नाशिक : निफाड येथील नैताळेचे कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र आणि एक किलो कांद्याची भेट दिली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड टॅम्प आणि त्यांची पत्नी येत्या दोन दिवशीय भारत दौऱ्यावर येत आहे. यासाठी नैताळे येथील संजय साठे आणि त्यांची पत्नी शोभा साठे यांनी ट्रम्प दांपत्याच्या स्वागतासाठी महाराष्ट्रीयन गांधी टोपी, उपरणे तसेच मेलनिया ट्रम्प यांच्यासाठी साडी आणि लाल कांद्याची अनोखी भेट यावेळी पाठवण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान संजय साठे यांनी यापूर्वी बाराक ओबामा यांची देखील भेट घेतली होती, आता डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्याची त्यांची इच्छा आहे. २४ आणि २५ फेब्रुवारीला टॅम्प दाम्पत्य भारत भेटीवर येत आहे. त्यानिमित्ताने त्यांनी एक पत्र तसेच वाण म्हणून साठे दाम्पत्यांनी लाल कांदा पाठविला आहे.

साठे यांनी लिहलेल्या पत्रात म्हटले आहे कि, अमेरिकेप्रमाणे भारतातील शेतकऱ्यांचं उत्पन्न आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना सुचवण्याची विनंती केली आहे. तसेच कार्पोरेट शेती आणतांना देशातला शेतकरी संपणार नाही याची जाण ठेवण्याचंही आवाहन त्यांनी यात केले आहे. कांद्याविषयी त्यांनी म्हटले आहे कि, कांदा निर्यात खुली करावी तसेच आपणही जेवणात कांद्याचा वापर करण्याचीही विनंती देखील साठे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या