Friday, April 26, 2024
Homeनाशिककोरोनामुळे मेडिकल्समधून सॅनिटाईजर गायब; मास्कसाठी धावाधाव

कोरोनामुळे मेडिकल्समधून सॅनिटाईजर गायब; मास्कसाठी धावाधाव

उपनगर : जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे शहरातील मेडिकल्समधून सॅनिटाईजर गायब झाल्याने हातरुमाल व मास्कला मागणी वाढली आहे. सॅनिटाईजरचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येते. कोरोनाच्या विषाणूपासून संरक्षण होण्यासाठी आवश्यक असलेल्या सॅनिटायझरचा साठेबाजी सुरु झाली आहे. यात अनेकांनी मंदीत संधी साधून रोजगार उपलब्ध केला आहे.

कोरोनामुळे जगभरातील लोक त्रस्त झाले असून सध्या भारतात देखील कोरोनाची दहशत पहायला मिळत आहे. त्यातच सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरांत अफवांचे पीक बेसुमार आले आहे. अफवांमुळे अनेक नागरिकांनी धसका घेऊन मेडिकलमध्ये हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटाईजरची मागणी होत आहे. परंतु मागील चार दिवसांपासून स्टोकिस्टकडे सॅनिटाईजरचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिक हतबल झाले आहे.

- Advertisement -

दरम्यान कोरोना मुळे अशी परिस्थिती उद्भवली असल्याचे दिसून येत असले तरी प्रत्यक्षात नफेखोरीसाठी सॅनिटाईजरचा तुटवडा निर्माण झाल्याचे भासवले जात आहे. मात्र मागच्या दाराने अव्वा च्या सव्वा किंमती सॅनिटायझरचा गोरखधंदा चालू असल्याचे समजते.

सरकारने प्रतिबंध साठी उपाययोजना करण्यावर भर दिला असून नागरिकांनी स्वतः च काळजी घेण्याचे आवाहन केले. सावलोन, लाईफ बॉय, डेटॉल या कंपनी चे सॅनिटाईजर यांच्या किंमती ४० ते ८० रुपयां च्या आसपास आहे. मात्र दैनंदिन चालणारे सॅनिटाईजर दुकानातून गायब झाल्याचे चित्र आहे.

तरुणांनी शोधला रोजगार

मेडिकल दुकानात मिळणारे मास्क हे युज ऐन थ्रो स्वरूपाचे असल्याने एकदाच वापरण्यात येते. मात्र हातरुमाल पुन्हा पुन्हा धुवून वापरता येतो. फेकलेल्या मास्क मधून संसर्ग होण्याची भीती असते. मात्र साध्या रुमालाची काहीच भीती नाही. रस्त्यावर मास्क हे ८० ते १०० रुपयांच्या घरात गेले आहे. हातरुमाल ला मागणी वाढल्याने १० ते २० रुपयांना मिळणारे हातरुमाल ४० ते ६० रुपयांना मिळू लागल्याने दिल्ली मेड मास्क आणि साधे हातरुमाल यांच्या बाजारपेठेत तेजी आली असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या