दिव्यांग सागर बोडके सर करणार ९० अंशातला वजीर!

दिव्यांग सागर बोडके सर करणार ९० अंशातला वजीर!

नाशिक : गरुडझेप प्रतिष्ठानचा दृष्टीबाधित सागर बोडके नवीन वर्षात गिर्यारोहण क्षेत्रात सर्वात आव्हान देणारा सुळका म्हणजे, ‘वजीर सुळका’ सर करणार आहे.

दरम्यान सागरने २०१९ या वर्षात २६ जानेवारी ते २ जून ह्या १२८ दिवसात २१ वेळा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई सर करून वंडर बुल ऑफ रेकोर्ड (लंडन) व ब्राव्हो बुक ऑफ रेकोर्ड (फ्रांस) मध्ये जागतिक विक्रम नोंदविला. आता नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तो अजून एक नवीन जागतिक विक्रम नोंदविणार आहे. यावेळी तो वजीर सुळका’ तो सर करणार आहे. वजीर सुळका हा 90 अंशातील सरळ सुळका आहे.

ठाणे जिल्ह्यात शहापूरच्या माहुली किल्ला परिसरातला हा सुळका असून चढाईसाठी अतिशय अवघड असं सुळका आहे. ही जागा पाहूनच जिथं सर्वसामान्यांच्या काळजाचा ठोका चुकतो तिथं या वजीर सुळक्याची चढाई करणं याची कल्पनाही करणं अशक्य आहे. पॉइंट ब्रेक एडवेंचर समूहाने हि मोहीम हाती घेतली आहे. दत्ता साळुंके, चेतन शिंदे, तुषार पाटील, मनोज वाघ,ओळ तेलंग, दीप नाचणकर व वेदांत व्यापारी हि तज्ञ मंडळी सागरला मदत करणार आहेत. गरुडझेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संदीप भानोसे ह्यांनी सागरला शुभेच्छा दिल्या आहेत .

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com