Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

उमराणे : कौतुकास्पद! ग्रामपंचायत सदस्य सचिन देवरे यांचे सपत्नीक रक्तदान

Share
उमराणे : कौतुकास्पद! ग्रामपंचायत सदस्य सचिन देवरे यांचे सपत्नीक रक्तदान Latest News Nashik Sachin Deore Donated Blood with his Wife At Umrane

उमराणे वार्ताहर । उमराणे येथे कोरोनाशी लढा देण्यासाठी ग्रामपंचायत व सिव्हिल हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर संपन्न झाले. येथील ग्रामपंचायत सदस्य सचिन देवरे यांनी सपत्नीक रक्तदान करीत आदर्श घालून दिला. यावेळी अवघ्या तीन तासांत ७८ बाटल्या रक्त गोळा झाले.

दरम्यान सध्या कोरोनावर मत कर्णयसाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. यातच ग्रामपंचायतीने रक्तदान घेण्याचे ठरविले. सिव्हिल हॉस्पिटलचे डॉ गिरीष देवरे यांनी केलेल्या सहकार्याने आयोजन तात्काळ झाले. उमराणे सोबत परिसरातील खारीपाडा सांगवी, कुंभाडे, तिसगाव येथील तरुण, महिलानी या रक्तदानात सहभाग घेतला. यासाठी ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

तसेच ग्रामीण रुग्णालयात कोरोना मुक्त उमराणे ग्रुपतर्फे ५ लिटर सॅनिटायझर, ५०० ग्लोव्हज आणि कर्मचारी वर्गासाठी मास्क तसेच दोन्ही मुख्य डॉक्टरांना N 95 मास्क इ. देण्यात आले आहे. कुठलाही शासकीय निधी न वापरता आपल्या कोरोना मुक्त ग्रुप उमराणे च्या माध्यमातून या दैनंदिन वापरातील वस्तू ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक पवार यांच्या कडे सुपूर्द केल्या.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!