Thursday, April 25, 2024
Homeनाशिकलॉकडाऊन काळात घरी जाण्यासाठी नाशिक पोलिसांची नियमावली; इथे सादर करा अर्ज?

लॉकडाऊन काळात घरी जाण्यासाठी नाशिक पोलिसांची नियमावली; इथे सादर करा अर्ज?

नाशिक : करोना व्हायरस संकटामुळे अवघा देश लॉकडाऊन आहे. जिल्ह्यातील विविध नागरिक विविध भागात अडकले आहेत. प्रत्येकालाच आपल्या गावी जाण्याची ओढ आहे. तुम्ही लॉकडाऊनमध्ये अडकला असाल आणि तुम्हाला घरी अथवा तुमच्या मूळ गावी जायचे असेल तर आता ते शक्य आहे.

दरम्यान नाशिक पोलिसांनी हा उपक्रम सुरू केला असून नागरिकांना नियमांचे पालन करत घरी जाण्यास सशर्थ परवानगी दिली आहे. त्यासाठी नाशिक पोलिसांनी विशिष्ट नियमावली आणि अर्ज नमूना तयार करुन दिला आहे. ‘तो’ विशिष्ट अर्ज भरुन देत नियम पाळण्याचा विश्वास दिल्यास तुम्ही आपल्या गावी जाऊ शकता.

- Advertisement -

नाशिक पोलिसांनी याबाबत नागरिकांना आपल्या गावी जाण्याच्या परवानगीसाठी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्याप्रमाणे जे नागरिक जिल्ह्यात अडकलेले आहेत. अशा नागरिकांनी संपूर्ण माहितीसह अर्ज सादर करावयाचा आहे.

हा अर्ज आपणास http://nashikepass.in/ या संकेतस्थळावर सादर करता येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या