Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकबेघर व परप्रांतीय मजुरांसाठी रिलीफ कॅम्प कार्यान्व‍ित: जिल्हाधिकारी

बेघर व परप्रांतीय मजुरांसाठी रिलीफ कॅम्प कार्यान्व‍ित: जिल्हाधिकारी

नाशिक । नजीकच्या जिल्ह्यातून आलेले स्थलांतरीत व जिल्ह्यांतर्गत असलेल्या बेघर व परप्रांतीय मजुरांसाठी रिलीफ कॅम्प कार्यान्वीत करण्यात आले असून त्यांची निवास व भोजन व्यवस्था करण्यावर भर दिला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

इमर्जंसी ॲक्शन सेंटरच्या माध्यमातून जिल्ह्यात जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवांचे संनियंत्रण केले जाते. आज बेघर व स्थलांतरीत नागरीकांसाठी रिलीफ कॅम्प, भारतीय अन्न महामंडळाकडून धान्य पुरवठा, दानशूर व्यक्त‍ि व संस्था, जीवनावश्यक उद्योगांना दिलेले परवाने, अन्न सुरक्षा कायद्यातंर्गत करण्यात आलेल्या कारवाईची जिल्हाधिकार्‍यांनी माहिती दिली.

- Advertisement -

बेघर व स्थलांतरितांसाठी रिलीफ कॅम्पची व्यवस्था

मुंबई, ठाणे, कल्याण येथून नाशिक येथे स्थलांतरित झालेल्या ५९० पैकी २९० लोकांची सुखदेव आश्रम, विल्होळी व ३०० लोकांची समाज कल्याण वसतिगृह, नासर्डी नाशिक येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील ८१ बेघर व २ हजार ३५७ परप्रांतातील अडकलेले मजूर अशा २ हजार ४३८ व्यक्तींकरिता जिल्ह्यात २३ ठिकाणी रिलीज कॅम्प सुरू करण्यात आले आहे. यातील १८ कॅम्प हे महानगरपालिका हद्दीत असून त्यामध्ये १ हजार ३३४ व्यक्तींच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. या १८ रिलीफ कॅम्पमध्ये सद्यस्थितीला इतर राज्यातील ८१ व स्थानिक ७५ असे १५६ मजूर राहत आहे.

भारतीय अन्न महामंडळाकडून धान्यपुरवठा

मनमाड येथील भारतीय अन्न महामंडळ गोदामातून ६१ ट्रक धान्य प्राप्त करून सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत एप्रिल २०२० मध्ये त्याचे वाटप जिल्ह्यातील सर्व गोदामांमध्ये करण्यासाठी संबंधित गोदामपाल यांचेशी संपर्क साधण्यात आला आहे. तसेच शिव भोजन थाळी केंद्रांना सुधारित सूचनांप्रमाणे थाळी वाटप करण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत.

जीवनावश्यक उद्योगांना परवाने
संचारबंदी काळात जिल्ह्यातील जीवनावश्यक उद्योगधंदे सुरू ठेवण्याबाबत काही अटींवर परवानगी दिली आहे. याबाबत आज अखेर १५२ अर्जांपैकी ९३ उद्योगांना त्यांच्या आस्थापना सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली असून १५ उद्योगांच्या नाकारल्या आहेत. तसेच ४४ अर्जांवर कार्यवाही प्रलंबित असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

अन्न सुरक्षेसाठी…

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी शहरातील आज अखेर २२३ किराणा दुकानाची पाहणी केली असून ५२ किराणा दुकानदारांना आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या