त्र्यंबकेश्वर : रेशन दुकानदाराला पेगलवाडीत मारहाण

jalgaon-digital
1 Min Read

त्र्यंबकेश्वर : कोरोना व्हायरसमुळे केंद्र व राज्य शासनाकडून राज्यातील अंत्योदय व प्राधान्य कुंटूंबधारकांना स्वस्त धान्य दुकानांकडून धान्य वाटप चालू आहे. परंतु पेगलवाडी (त्र्यंबक ) येथे एका व्यक्तीने केसरी कार्ड धारकांना धान्य द्यावे याकरिता शासकीय स्वस्त धान्य दुकानदाराला बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेशन दुकानदार नामदेव किसन झोले रा.पेगलवाडी यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यामातून अंत्योदय व प्राधान्य कुंटूंबधारकांना रेशन वाटप चालू केले आहे.

स्वस्त धान्य दुकानदार नामदेव किसन झोले हे धान्य वाटप करीत असतांना सनी मेढे रा.अंबोली सध्या रा.पेगलवाडी याने केसरी रेशनकार्ड धारकांना धान्य देण्याची मागणी करुन स्वस्त धान्य दुकानदारांस बेदम मारहाण केली. तसेच शिवी गाळ करीत दुकानातील रेशन वाटप मशीनची तोडफोड करण्यात आली.

या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस भादवि कलम ३२४,५०४,५०६ , ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांच्या मार्गदर्शन खाली सहा.पो.उपनिरीक्षक एस वाय आहेर करीत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *